esakal | लग्न जमल्याच्या आनंदात पार्टी...अन्‌ पार्टीच्या नादात नशिबाने दाखवला असा ठेंगा की...तुम्हीच पाहा ना!
sakal

बोलून बातमी शोधा

bachlor party.png

लग्न जमले म्हणून भाऊ खूपच आनंदात होता. आनंदाला कारणही तसेच होते. तब्बल पाच वर्षांपासून लग्नासाठी मुली पाहत होता पण या-ना त्या कारणाने मुलींच्या घरच्यांकडूनच नकार मिळाला होता. अशा परिस्थितीत बऱ्याच प्रयत्नांनंतर एका आप्तामार्फत लग्न जमल्याने तरुणाचा आनंद गगनात मावेना. ही गोष्ट आजूबाजूला मित्रमंडळींत वाऱ्यासारखी पसरली. 

लग्न जमल्याच्या आनंदात पार्टी...अन्‌ पार्टीच्या नादात नशिबाने दाखवला असा ठेंगा की...तुम्हीच पाहा ना!

sakal_logo
By
सतीश निकुंभ :सकाळ वृत्तसेवा

नाशिक / सातपूर : लग्न जमले म्हणून भाऊ खूपच आनंदात होता. आनंदाला कारणही तसेच होते. तब्बल पाच वर्षांपासून लग्नासाठी मुली पाहत होता पण या-ना त्या कारणाने मुलींच्या घरच्यांकडूनच नकार मिळाला होता. अशा परिस्थितीत बऱ्याच प्रयत्नांनंतर एका आप्तामार्फत लग्न जमल्याने तरुणाचा आनंद गगनात मावेना. ही गोष्ट आजूबाजूला मित्रमंडळींत वाऱ्यासारखी पसरली. अन् मग..

असे घडले तर...

लग्नानंतर वैवाहिक आयुष्यात गोड व कडू फळ चाखायला मिळत असले, तरी विवाह ही प्रत्येक मुला-मुलीच्या जीवनातील अविस्मरणीय घटना असते. सातपूरच्या श्रमिकनगर भागातील एका तरुणाच्या आयुष्यात अशीच घटना घडली. त्याचे काही दिवसांपूर्वी लग्न जमले. लग्न जमले म्हणून भाऊ खूपच आनंदात होता. आनंदाला कारणही तसेच होते. तब्बल पाच वर्षांपासून लग्नासाठी मुली पाहत होता पण या-ना त्या कारणाने मुलींच्या घरच्यांकडूनच नकार मिळाला होता. अशा परिस्थितीत बऱ्याच प्रयत्नांनंतर एका 
आप्तामार्फत लग्न जमल्याने तरुणाचा आनंद गगनात मावेना. ही गोष्ट आजूबाजूला मित्रमंडळींत वाऱ्यासारखी पसरली. 

मित्रांच्याच शुभेच्छा त्या, पार्टी तर मागणारच!

साहाजिकच विवाह ठरलेल्या तरुणावर चारही बाजूने शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. मित्रांच्याच शुभेच्छा त्या, पार्टी तर मागणारच! सगळ्या मित्रांकडून लग्न ठरल्याबद्दल पार्टीसाठी लकडा सुरू होता. पण लॉकडाउनमुळे पार्टी देता येईना. अशातच ज्याने लग्न जमविले त्या मध्यस्थी असलेल्या आप्ताने पार्टीची मागणी केली मग मात्र भाऊ पेटून उठला. तावातावात एक-दोन मित्रांना फोन करत कुठे दारूची व्यवस्था होते का, याची चाचपणी केली. त्यात एकाने होकार देत गिरणारे भागात एका मित्राकडे आहे पण घ्यायला जावे लागेल. भाऊ लगेचच तयार झाला. लॉकडाउनच्या काळात दुचाकीवर आडमार्गाने जाऊन दारू आणली. वाटेत मित्राने आग्रह केला म्हणून रस्त्यातच दोन-दोन घोट मारत उरलेली दारू डिकीत ठेवली. पोटात दोन घोट गेल्यावर गिरणारेहून गाडी अधिकच सुसाट निघाली. अशातच समोरून एकाने कट मारला आणि भाऊ मित्रासह हातपाय मोडून हॉस्पिटलच्या बेडवर जाऊन पडला. अपघाताची बातमी गल्लीत समजली तशी भावी सासुरवाडीला समजली. मुलीच्या घरच्यांनी क्षणाचा विचार न करता विवाहाला थेट नकार देत "टाटा' केला.  

हेही वाचा > "पैसे नाही दिले..तर अंगावर थुंकून कोरोनाबाधित करेन..."अजब धमकीने त्याच्या पायाखालची सरकली जमीन!

अंथरुणावर पडण्याची वेळ

लग्न जमल्याच्या आनंदामुळे मित्रांनी पार्टी मागितली. लॉकडाउनमुळे मित्रासोबत ग्रामीण भागात दारू आणायला गेला. पण वाटेत अपघात झाला आणि मित्रासह हातपाय मोडून अंथरुणावर पडण्याची वेळ आलीच मात्र ही घटना मुलीकडच्यांना समजल्यावर त्यांनीही लग्नाला नकार दिला. ही लग्न जमल्याच्या आनंदामुळे पार्टी देण्याच्या नादात मुलगी गमावण्याची वेळ श्रमिकनगर भागातील एका तरुणावर आली. 

हेही वाचा > मरणानंतरही मिळेना मोक्ष... हजारो अस्थीकलश झाडालाच लटकलेल्या अवस्थेत ..कारण वाचून व्हाल थक्क 

loading image
go to top