Nashik News : वऱ्हाडाच्या पीकअपला अपघात; 2 ठार, 14 जखमी

overturned pickup truck.
overturned pickup truck.esakal

Nashik News : शिंगळचोंड (ता. सुरगाणा) येथील नववधूला घेण्यासाठी जाणाऱ्या वाघधोंड येथील पीकअपला गावाजवळच अपघात झाल्याने हेमराज रमेश थविल (१०, रा. गारमाळ) आणि कमी सयाजी देशमुख (७०, रा. वाघधोंड) यांचा मृत्यू झाला. इतर अकरा जणांना गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (wedding Pickup Accident 2 killed 14 injured at surgana Nashik News)

overturned pickup truck.
Pune Crime: धक्कादायक! वसतिगृहात राहणार्‍या विद्यार्थ्याने गळफास लावून केली आत्महत्या

वाघधोंड येथील वऱ्हाडी शिंगळचोंड येथे नववधूला घेण्यासाठी पीकअपने (एमएच १५, एचएच ९७८७) वीस ते पंचवीस जण जात होते. वाघधोंड गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने पीक अप पंधरा ते वीस फूट खोल असलेल्या भातशेतीच्या खाचरात उलटली.

हा अपघात दुपारी चार ते साडेचारच्या दरम्यान झाला.जखमींमध्ये प्रल्हाद लक्ष्मण महाले (16, रा. गणेशनगर), मीनाबाई गोविंद गावित (56), सुमन यशवंत देशमुख (32), जानकी रामदास जाधव(32), रंगूबाई सीताराम देशमुख (65), अनू रोहिदास देशमुख (60),

पार्वती पुंडलिक देशमुख (65), लिलाबाई हरी देशमुख (45), परिबाई भगवान देशमुख(50), वंदना रोहिदास देशमुख (26), चंद्राबाई काळू देशमुख (65), प्रमिला चंदर भोये (45), यमुना माधव जाधव (40), श्रीराम लहानू चौधरी (45), शेवंताबाई काशिनाथ गुंबाडे (50) सर्व वाघधोंड येथील रहिवासी आहेत. पोलिस निरीक्षक संदीप कोळी तपास करीत आहेत. दरम्यान घटनेनंतर चालक फरार झाला आहे.

overturned pickup truck.
Nashik News : हरसुले येथील पोलीस पाटील शिंदे यांचा विहिरीत पडून मृत्यू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com