esakal | ''स्वबळावर भगवा फडकवणार, हे मी गेल्या 30 वर्षांपासून ऐकतोय''
sakal

बोलून बातमी शोधा

Pawar.jpg

या आघाडीतील एखादा पक्ष स्वतःचे काही संघटनात्मक कार्यक्रम राबवत असेल तर त्याबाबत फार मनाला लावून घेण्याचा विषय नसतो. विधानसभेवर भगवा फडकणार हे भाषण मी गेले तीस वर्षे एैकत आलो आहे. त्यावर एव्हढी चर्चा कशासाठी? असा प्रश्‍न त्यांनी केला. 

''स्वबळावर भगवा फडकवणार, हे मी गेल्या 30 वर्षांपासून ऐकतोय''

sakal_logo
By
संपत देवगिरे

नाशिक : नुकतेच शिवसेना नेते संजय राऊत यांनी तसेच शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात विधानसभ भगवा फडकणार, असे वक्तव्य केले होते. हा धागा पकडून पत्रकारांनी श्री. पवार यांना विचारले होते. यावेळी त्यांनी खोचक टोला लगावला, 'स्वबळावर भगवा फडकवणार हे मी गेल्या 30 वर्षांपासून ऐकत आलोय.'  

त्यावर एव्हढी चर्चा कशासाठी? 

बुधवारी (ता. 28) नाशिक जिल्हा दौऱ्यावर असतांना शरद पवार यांनी कांदा उत्पादक शेतकरी व व्यापारी यांच्याशी चर्चा करून त्यांचे प्रश्न समजून घेतले. यावेळी पत्रकारांशी बोलतांना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, भाजप सत्तेतून दूर ठेवण्यासाठी आम्ही तिन्ही पक्ष राज्यात एकत्र आलो. त्यातून राज्याचा कारभार केला जात आहे. त्याची चांगली कामे होत आहेत. त्यामुळे या आघाडीतील एखादा पक्ष स्वतःचे काही संघटनात्मक कार्यक्रम राबवत असेल तर त्याबाबत फार मनाला लावून घेण्याचा विषय नसतो. विधानसभेवर भगवा फडकणार हे भाषण मी गेले तीस वर्षे एैकत आलो आहे. त्यावर एव्हढी चर्चा कशासाठी? असा प्रश्‍न त्यांनी केला. 

हेही वाचा >  पिंपळगावच्या टोमॅटोचा देशभरात डंका! सव्वाचारशे कोटी शेतकऱ्यांच्या पदरात 

त्याचा अर्थ आम्ही कॉंग्रेसला सोडले असे नाही...

शरद पवार पुढे म्हणाले, नुकताच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे काही कार्यक्रम झाले. त्याचा अर्थ आम्ही कॉंग्रेसला सोडले, असा होत नाही. कॉंग्रेसने देखील पक्षविस्तारासाठी काही उपक्रम राबविले तर, त्याचा वेगळा अर्थ निघत नाही, तसेच शिवसेनेने मेळावे घेतले, काही विधाने केली. संघटनात्मक विस्ताराचे कार्यक्रम केले, तर त्याचा अर्थ त्यांनी महाविकास आघाडीतील पक्षांपेक्षा वेगळा विचार मांडला असा होत नाही. प्रत्येक पक्षाला संघटनात्मक विस्ताराचा. कार्यक्रम राबविण्याचा अधिकार आहे. याबाबत काही बोलायचेच असेल, शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि कॉंग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात ठरवतील. त्यांनाच याविषयी विचारा असेही ते म्हणाले.

हेही वाचा > ह्रदयद्रावक; आजोबांना दोन घास दिल्याचे समाधान घेऊनच नात झाली देवाला प्रिय, दसऱ्याच्या दिवशीच हळहळ