Nashik ZP News : जि.प. सीईओ व्हॉट्सॲपद्वारे होणार 1388 सरपंचांशी ‘कनेक्ट’

WhatsApp will be used for direct communication between CEO and Sarpanch nashik zp news
WhatsApp will be used for direct communication between CEO and Sarpanch nashik zp newsesakal

Nashik ZP News : जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतर्गत असलेले निर्णय, योजना यांची माहिती प्रत्येक सरपंचांपर्यंत पोचविण्यासाठी मोठा कालावधी लागततो, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सरपंचांशी थेट संवाद व्हावा, यासाठी व्हॉट्सॲपद्वारे कनेक्ट होण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यासाठी जिल्ह्यातील एक हजार ३८८ सरपंचांचे व्हॉट्सॲप ग्रुप तयार केले जाणार असल्याचे श्रीमती मित्तल यांनी सांगितले. (WhatsApp will be used for direct communication between CEO and Sarpanch nashik zp news)

ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्वांत वरचा टप्पा असलेलीला जिल्हा परिषद आणि शेवटचा घटक असलेली ग्रामपंचायत यामध्ये संवादाचा सेतू भक्कम असणे आवश्यक असते. त्यामुळे विकासाबाबत काहीही महत्त्वाचे निर्णय, अंमलबजावणी किंवा ग्रामस्तरावर असलेल्या सर्व बाबी एकमेकांकडे हस्तांतरित होणे आवश्यक आहे.

त्यासाठी कार्यालयातील पत्रव्यवहार होत असतातच. मात्र या लालफितीमुळे कधी कधी उशीर होण्याची शक्यता असते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

WhatsApp will be used for direct communication between CEO and Sarpanch nashik zp news
ZP Super 50 : जिल्हा परिषदेतर्फे यंग टॅलेंट हुडकण्याचे काम : आशिमा मित्तल

त्यास छेद देण्याचा निर्णय श्रीमती मित्तल यांनी घेतला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सरपंचांमध्ये थेट संवाद होण्यासाठी व्हॉट्सॲपचा वापर केला जाणार आहे.

यात तालुकानिहाय सरपंचांचे व्हॉट्सॲप ग्रुप तयार केले जाणार आहेत. प्रशासनाने घेतलेले निर्णय, उपक्रम तत्काळ सरपंचांपर्यंत पोचविले जातील. यातून सर्व प्रशासन गतिमान होण्यास मदत मिळेल. गावपातळीवर योजना, उपक्रम पोचण्यास मदत होईल, असे श्रीमती मित्तल यांनी सांगितले.

WhatsApp will be used for direct communication between CEO and Sarpanch nashik zp news
Nashik News: ZP इमारतीत लिकेज जैसे थे! प्राथमिक शिक्षण विभागात मोठया प्रमाणात पाण्याची गळती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com