esakal | मार्चपासून पेन्शनअभावी हाल; निवृत्त कर्मचाऱ्यांकडून त्वरित कार्यवाहीची मागणी 
sakal

बोलून बातमी शोधा

senior-citizen 1234.jpg

चीनच्या वुहान प्रांतातून निघालेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण जग हादरले आहे. त्याचाच परिपाक म्हणजे २४ मार्चपासून संपूर्ण भारतात लॉकडाउन झाला. त्याचा फटका मार्चमध्ये वयोमानानुसार शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्यांपासून तर आजतागायत एकाही कर्मचाऱ्याला त्याची हक्काची पेन्शन मिळण्यास बसत आहे

मार्चपासून पेन्शनअभावी हाल; निवृत्त कर्मचाऱ्यांकडून त्वरित कार्यवाहीची मागणी 

sakal_logo
By
रवींद्र मोरे

नाशिक / बिजोरसे : चीनच्या वुहान प्रांतातून निघालेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण जग हादरले आहे. त्याचाच परिपाक म्हणजे २४ मार्चपासून संपूर्ण भारतात लॉकडाउन झाला. त्याचा फटका मार्चमध्ये वयोमानानुसार शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्यांपासून तर आजतागायत एकाही कर्मचाऱ्याला त्याची हक्काची पेन्शन मिळण्यास बसत आहे. यामुळे निवृत्त झालेल्यांचे पेन्शच्या रकमेअभावी हाल होत आहेत. 

कोरोनामुळे मार्चपासून पेन्शनअभावी हाल 
महाराष्ट्रात मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक या शहरांमध्ये जास्त प्रमाणात कोरोनाने थैमान घातले असून, कोरोना आता खेड्यांतही घुसला आहे. तो केव्हा हद्दपार होईल तो येणारा काळच ठरवेल. मात्र सर्वसामान्य लोकांचे जनजीवन आजही विस्कळितच आहे. मार्चमध्ये लॉकडाउन झाल्याने व त्याच महिन्यात वयोमानानुसार शासकीय कर्मचारी निवृत्त झाले. काही कर्मचारी मृत झाले व त्यांची फॅमिली पेन्शन अजून मंजूर झाली नसल्याने कुटुंबीयांचेही हाल होत आहेत. पेन्शन नाही म्हणून ग्रॅच्युइटीचे पैसे नाहीत, तसेच भविष्यनिर्वाह निधीमध्ये जमा झालेला पैसासुद्धा मिळाला नाही. गेल्या सात महिन्यांपासून कर्मचारी चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. 

हेही वाचा > भीषण! ३५ हून अधिक मजुरांचा तो कानठळ्या बसविणारा आवाज; महामार्गावरील थरार

निवृत्त कर्मचाऱ्यांकडून त्वरित कार्यवाहीची मागणी 
नाशिक येथे वेतनपथक (पे युनिट)च्या कार्यालयात तपास केला असता हे सर्व प्रकरण मुंबई येथे हे (एजी) अकाउंट ऑफ जनरल मंत्रालयात मंजुरीसाठी पाठविले असून, ते मंजूर झाले तर पेन्शन सुरू होईल. मुंबईला तपास केला असता आता कर्मचारी कामावर यायला लागले असून, आम्ही मंजूर करू, असे सांगितले जात आहे. मात्र याचा परिणाम घरात एकच कमावणारी व्यक्ती म्हणजे पेन्शन. त्यात आजारपण. काही कर्मचाऱ्यांची मुले लॉकडाउन मुले घरीच असल्याने दुसरे उत्पन्नाचे साधन नसल्याने पेन्शनअभावी हाल होत आहेत. यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी निवृत्त कर्मचारी किशोर आहिरे, व्ही. आर. शेवाळे, सी. टी. कापडणीस, वाय. डी. निकम, एस. बी. निकम, सुरेश जगताप आदींनी केली आहे.  

 हेही वाचा >  तीन दिवसांपासून शोधाशोध; आणि तपास लागला १५० फूट खोल गाळात!

संपादन - ज्योती देवरे

loading image