esakal | नियतीपुढे सुटला धीर; शेतकरी महिलेला अतिवृष्टीचा कहर असह्य
sakal

बोलून बातमी शोधा

suicide

अतिवृष्टीने झालेले नुकसान असह्य; महिलेने केले विषप्राशन

sakal_logo
By
शशिकांत पाटील

न्यायडोंगरी (जि.नाशिक) : काबाडकष्ट अन् मेहनत करून शेती फुलवली...पण नियतीला ते मान्य नव्हतं. एकतर आधीच कोरोनाच्या संकटामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला पण आता अचानक आलेल्या अतिवृष्टीमुळे भयंकर नुकसान झाले अन् तिचा धीर सुटला....

पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान

न्यायडोंगरी येथे मंगळवारी (ता. ७) सप्टेंबरच्या मध्यरात्री झालेल्या अतिपावसाने महादेव डोंगर रांगेतील परधाडी येथील कोल्ही नाल्यास मोठ्या प्रमाणावर पूर गेल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले होते व पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. हातातोंडाशी आलेले मका व कपाशी पीक भुईसपाट झाल्यामुळे मंदा भाऊसाहेब काकळीज या शेतकरी महिलेने आपली जीवनयात्रा संपवली. अतिवृष्टीमुळे नांदगाव तालुक्यातील शेतीचे नुकसानीचे स्वरूप गंभीर असल्याचे या घटनेमुळे अधोरेखित होत आहे. मंदाबाई यांच्या मागे दोन मुले, सुना, एक मुलगी पती व सासू असा परिवार आहे. अतीवृष्टीमुळे शेतच वाहून गेल्याने खचलेल्या पन्नास वर्षीय शेतकरी महिलेने विषप्राशन केले. अतिवृष्टीने कोल्ही नाल्याचे पाणी शेतात शिरून तब्बल १२ एकर शेतीतील मका व कपाशी पिके भुईसपाट झाल्याने यांनी विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना न्यायडोंगरी येथे घडली.

हेही वाचा: दोन प्रकरणात न्याय मिळाला, पुढेही मिळेल - छगन भुजबळ

हेही वाचा: अंबासन येथील सूनबाईंच्या हाती शिर्डी संस्थानचा कारभार!

loading image
go to top