Crime News : लिफ्ट घेणे महिलेला पडले महागात! कारमधील महिलेने लांबविली 13 ग्रॅमची सोनपोत

 theft gold chain
theft gold chainesakal

Nashik Crime News : महिला वर्गाला अनेक ठिकाणी चोरट्यांनी फसवेगिरी करून सोने लांबविल्याचे प्रकार घडत आहेत.

नांदूरशिंगोटे येथील निमोण नाक्यावर कारची लिफ्ट घेऊन तळेगावकडे जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील तेरा ग्रॅमची सोन्याची पोत कारमध्ये बसलेल्या महिलेने लांबवल्याची घटना नुकतीच घडली. (woman in car stolen 13 gram gold chain nashik crime news)

सुनीता शिवदास गिते (रा. सोनोशी, ता. संगमनेर) या भावाच्या वर्षश्राद्धासाठी जात होत्या. संगमनेरवरून त्या नांदुरशिंगोटे येथील निमोण नाक्यावर उतरून खासगी वाहनांची वाट पहात होत्या. यावेळी एका चॉकलेटी रंगाच्या कारचालकाने त्यांना लिफ्ट दिली. कारमध्ये एक महिलाही बसलेली होती.

निमोण रस्त्याने कार जात असताना काही अंतरावर सुनीता यांनी कारच्या दरवाजाची काच खाली घेतली. मात्र, कारमधील महिलेने महिलेला काच खाली न घेण्याचे सांगत तिच्या हाताने पुन्हा कारची काच खाली घेतली. कारमधील महिलेने नकळत सुनीता यांच्या गळ्यातील तेरा ग्रॅम वजनाची पोत लांबवली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

 theft gold chain
Nashik Crime News : पोलिसाची कॉलर धरणाऱ्यास 6 महिन्यांचा कारावास

सुनीता या कारमधून उतरल्यानंतर काहीवेळानंतर त्यांना आपली पोत चोरी गेल्याचे लक्षात आले. मात्र, तोपर्यंत कार निघून गेली होती. सुनीता यांनी श्राद्धाचा कार्यक्रम उरकून वावी पोलिस ठाण्यात कारचालक व कारमधील अज्ञात महिलेच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

बाहेर जाताना दागिने नकोच

महिलांनी शक्यतो बाहेर गावी जाताना सोन्याचे दागिने घालून जाऊ नये असे आवाहन पोलिस सतत करीत असतात. बोलण्यात गुंगवून असे दागिने लांबविल्याच्या घटना दररोज घडत असताना ही काळजी घेणे गरजेचे आहे. अजूनही अनेक महिला बाहेरगावी जाताना सोन्याचे दागिने वापरतातच, ते टाळावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 theft gold chain
Nashik Crime: औरंगपूर येथे अल्पवयीन मुलींची छेडछाड; 11 जणांवर गुन्हा दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com