नाशिक Viral Video : दुचाकीला कारची धडक, महिलेला 30 फूटांपर्यंत फरफटत नेलं

Accident
Accidentesakal

सटाणा (जि. नाशिक) : सटाणा शहरातील गंगाराम कॉलनीच्या समोरील मालेगाव रस्त्यावर आज गुरुवार (ता.१७) रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात ५५ वर्षीय महिलेचा मुत्यु झाला आहे. हा अपघात (Accident) इतका भयंकर होता की कारच्या पुढील भागात महिला अडकल्याने कारने महिलेला तब्बल ३० फूट फरफटत नेले. अंगावर शहारा आणणारा हा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. (Woman killed in two-wheeler-car accident)

...अन् त्या 30 फूट फरफटत गेल्या

याबाबत सटाणा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुभाष अनमूलवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेनऊच्या सुमारास निर्मला शिवाजी सोनवणे (वय ५५, रा.गंगाराम कॉलनी, सटाणा) या आपला मुलगा प्रशांत शिवाजी सोनवणे (वय ३६) याच्यासोबत दुचाकी (MH-41-Z-4793) वरून सावकी येथील मळ्यात जाण्यासाठी सटाणाच्या दिशेने निघाल्या होता. याचवेळी गंगाराम कॉलनीतून संजय बारकू सोनवणे (४५, रा. बाजार समिती जवळ, मालेगाव रोड, सटाणा) हे आपल्या कारने (MH-41-AZ-6725) मालेगाव रस्त्याच्या दिशेने येत होते. अचानक संजय सोनवणे यांचा कारवरील ताबा सुटला आणि मालेगाव रस्त्यावर महिंद्रा शोरूमसमोर मालेगावकडे जाणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते पंकज सोनवणे यांच्या कारला (MH-14-BR-7331) उजव्या बाजूला निसटती धडक दिली. याचवेळी प्रशांत सोनवणे यांच्या दुचाकीला सुद्धा संजय सोनवणे यांच्या कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या निर्मला सोनवणे या दुचाकीवरून रस्त्यावर जोरात खाली पडल्या आणि कारच्या पुढील चाकांच्या खाली आल्या. यावेळी कारने त्यांना तब्बल ३० फूट पूढे रस्त्यावर फरफटत नेले. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

Accident
धुक्यामधून आला लहान मुलांच्या ओरडण्याचा आवाज; पाहताच बसला धक्का

अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. अपघातात निर्मला सोनवणे यांच्या पोटाला, छातीला, हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. सामाजिक कार्यकर्ते पंकज सोनवणे यांनी तात्काळ रस्त्यावरील एक रिक्षा थांबवून जखमी सोनवणे यांना त्वरित खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र रक्तस्राव आणि गंभीर जखमी झाल्याने सोनवणे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुभाष अनमूलवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Accident
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणानंतरही अपघात; दुर्घटनांतून मुक्तता कधी ?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com