नाशिक : स्वच्छ पाण्याची जबाबदारी येणार महिलांच्या हाती

जिल्ह्यात पाणी गुणवत्ताविषयक प्रशिक्षणास सुरवात
नाशिक : स्वच्छ पाण्याची जबाबदारी येणार महिलांच्या हाती

नाशिक : पाणी गुणवत्ता(Water quality), दूषित पाण्यापासून(Contaminated water) होणारे आजार, पाणी गुणवत्ता तपासणीसाठी आवश्यक असलेले घटक याबाबत आता गावातील महिलांना प्रशिक्षण देवून त्यांच्यावरच ग्रामस्थांना स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या(nashik jilha parishad) सभागृहात जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनतर्फे जलजीवन मिशन अंतर्गत पाणी गुणवत्ता विषयक प्रशिक्षणास मंगळवारपासून (ता.२८) सुरवात झाली.

नाशिक : स्वच्छ पाण्याची जबाबदारी येणार महिलांच्या हाती
नाशिक टीडीआरच्या दरात अव्वाच्या सव्वा वाढ

जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता व आरोग्य विभागाच्या समन्वयाने जिल्ह्यात पाणी गुणवत्ता कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये पाण्याचे शुद्धीकरण, रासायनिक व जैविक तपासणी, स्वच्छता सर्वेक्षण यावर काम करण्यात येत आहे. जलजीवन अभियानांतर्गत पाणी गुणवत्ता कार्यक्रमात गावातील महिलांचा सहभाग घेण्याच्या शासनाच्या सूचना असून त्यानुसार प्रत्येक गावातील पाच महिलांची निवड करून त्यांना प्रशिक्षित करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात नाशिक, त्रंबकेश्वर, इगतपुरी व सिन्नर येथील निवडक जलसुरक्षक व तालुका समन्वयक यांना प्रशिक्षण देण्यात आले. महिलांच्या सहभागाने पाणी गुणवत्ता कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

नाशिक : स्वच्छ पाण्याची जबाबदारी येणार महिलांच्या हाती
नाशिक जिल्‍हा म्‍युकरमायकोसिसमुक्‍त; जिल्हाधिकारी सूरज मांढरे

पाणी व स्वच्छता विभागाचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे यांच्या हस्ते प्रशिक्षणाचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना श्री. चाटे यांनी पाणी गुणवत्ता अंतर्गत पाण्याचे महत्त्व, पाणी तपासणी, ऑनलाइन नोंदी याबाबत माहिती दिली. पाणी गुणवत्ता कार्यक्रमात यासाठी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहेत. या प्रशिक्षणात पाणी गुणवत्ता, दूषित पाण्यापासून होणारे आजार, पाणी गुणवत्ता तपासणीसाठी आवश्यक असलेले विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रशिक्षणात जिल्हा पाणी गुणवत्ता निरिक्षक सुरेश जाधव, पाणी गुणवत्ता सल्लागार भाग्यश्री बैरागी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी जलसुरक्षक, जिल्हा कक्षातील सल्लागार, तालुका समन्वयक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com