esakal | "मुख्यमंत्री साहेब! उपासमारीने व्याकूळ झालोय..आम्हाला गावाकडे जाऊ द्या."
sakal

बोलून बातमी शोधा

majur with uddhav thakre.jpg

वांद्रे रेल्वेस्थानकाबाहेर सुमारे हजारो परराज्यातील नागरिक त्यांना त्यांच्या राज्यात जाऊ द्या, अशी मागणी करत रस्त्यावर उतरले होते. असे उद्रेक राज्यभारत वाढले तर कोरोनाशी लढणे अवघड होऊन बसेल. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाउन कालावधी 3 मेपर्यंत वाढविल्याने शेतमजूर, ऊसतोड कामगार, बांधकाम आणि इतर सर्व कामगार वैफल्यग्रस्त होऊन रस्त्यावर उतरायला सुरवात झाली आहे.

"मुख्यमंत्री साहेब! उपासमारीने व्याकूळ झालोय..आम्हाला गावाकडे जाऊ द्या."

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक / सातपूर : कोरोनामुळे देशभरात लागू केलेल्या लॉकडाउनमुळे मजुरांची आणि गरिबांची उपासमार होत आहे. उपासमारीने व्याकूळ झालेल्या मजुरांनी वांद्य्रात लॉकडाउनला झुगारून विरोध दर्शविला. मजुरांचा प्रश्‍न गंभीर होत असून, राज्यातील मजुरांना आपापल्या गावी जायची परवानगी तत्काळ द्यावी, अशी मागणी शेतकरी, शेतमजूर, महिला आणि कामगार संघटनांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. 

महाराष्ट्रात परिस्थिती आटोक्‍यात आणणे पुढच्या काळात अवघड

वांद्रे रेल्वेस्थानकाबाहेर सुमारे हजारो परराज्यातील नागरिक त्यांना त्यांच्या राज्यात जाऊ द्या, अशी मागणी करत रस्त्यावर उतरले होते. असे उद्रेक राज्यभारत वाढले तर कोरोनाशी लढणे अवघड होऊन बसेल. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाउन कालावधी 3 मेपर्यंत वाढविल्याने शेतमजूर, ऊसतोड कामगार, बांधकाम आणि इतर सर्व कामगार वैफल्यग्रस्त होऊन रस्त्यावर उतरायला सुरवात झाली आहे. महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती आटोक्‍यात आणणे पुढच्या काळामध्ये अवघड होईल. त्यामुळे स्थलांतरित नागरिक आणि कामगारांना त्यांच्या राज्यात, जिल्ह्यात त्यांच्या तालुक्‍यात त्यांच्या गावी जाण्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय घ्यावा, अशी विनंती आणि मागणी अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. कराड, महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनचे अध्यक्ष बळिराम भुंबे यांनी केली. 

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित रूग्णाचा अंगावर थुंकण्याचा प्रकार..अँम्ब्युलन्स चालकाला मारहाण

गावी गेल्यावर तपासणी करा 
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतून दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये हजारो कामगार स्थलांतरित झालेले आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नगर, औरंगाबाद, नागपूर आदी शहरांमध्ये सर्व असंघटित क्षेत्रातील स्थलांतरित कामगारांची संख्या मोठी आहे. या स्थलांतरित कामगारांनाही त्यांच्या जिल्ह्यात आणि गावात जाण्याचे नियोजन करण्याची आवश्‍यकता आहे. गावी गेल्यानंतर त्यांची तपासणी, विलगीकरण आणि उपचार अधिक चांगल्या पद्धतीने करता येतील, असे संघटनांचे म्हणणे आहे. 

VIDEO : जेव्हा विश्वास नांगरे पाटलांना आदेश मिळतो "तुम्ही बाहेर सीपी असाल, पण इथले 'एसीपी' आम्ही आहोत"!