Election
sakal
नाशिक: जिल्ह्यातील ११ नगरपालिकांमध्ये मंगळवारी (ता.२) शांततेत मतदान पार पडले. यावेळी मतदारांच्या उस्फूर्त प्रतिसाद लाभला असून अनेक केंद्रांवर सायंकाळी साडेपाचनंतरही रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. जिल्ह्यात सरासरी ६८.३४ टक्यांहून अधिक मतदानाची नोंद झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये सर्वाधिक ८५.६६ टक्के मतदानाची नोंद झाली. उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त झाले असून निकाल २१ डिसेंबर रोजी घोषित होणार आहे.