Nashik News: निमगाव मढ येथे शेततळ्यात पडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

Nashik News: निमगाव मढ येथे शेततळ्यात पडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

चिचोंडी : निमगाव मढ (ता.येवला) येथे कांदा लागवडीसाठी शेततळ्यातुन पाणी सुरू करताना सतीश अशोक लभडे (वय ३२) या तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज शनिवार (दि.१६) रोजी दुपारी घडली. ()Young farmer dies after falling in farm at Nimgaon Madh Nashik News

केंद्र सरकारचे शेतकरी विरोधी धोरण आणि वीजेसह पाटपाण्याचे लांबलेले रोटेशन यामुळे शेतकरी नेहमीच अडचणीत आल्याचे दिसत आहे. खरीप हंगाम वाया गेल्यानंतर रब्बी मध्ये आपल्याकडे उपलब्ध पाण्यावर कांदे करण्याची सध्या लगबग परिसरात सुरू आहे.

पाटपाण्याचे रोटेशन एकच येणार असल्याने बळीराजा कांद्याच्या नियोजनात व्यस्त आहे. निमगाव मढ येथे सतीश अशोक लभडे हे आपल्या शेतातील शेततळ्यातुन पाणी सुरू करीत असताना त्यांचा तोल गेल्याने ते शेततळ्यात पडले.

दरम्यान शेजारच्या शेतकऱ्यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र शेततळे पूर्ण भरलेले असल्याने त्यांना वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले नाही. दरम्यान पोहणारे रावसाहेब मोरे यांनी त्यांना बाहेर काढले मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

Nashik News: निमगाव मढ येथे शेततळ्यात पडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
Nashik Crime: खळबळजनक! टिटवे येथून अपहरण झालेल्या युवकाचा खून करुन प्रेत पुरले

शेतीला केवळ आठ तास वीज असल्याने त्यात खंडित विजेमुळे अडचणी येत असल्याने रात्री अपरात्री पाणी द्यावे लागते. आणि दुसरीकडे यंदा पाऊस कमी झाल्याने पाण्याचीही शाश्वती नाही अल्प पाण्यावर अनेक शेतकऱ्यांनी उत्पन्न घेण्याकडे लक्ष दिले आहे.

मात्र या धावपळीत अशी दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मयत सतीश यांच्यामागे दोन व चार वर्षाची मुले आहेत.

सतीश हा घरातील कर्ता होता. मागील काही वर्षांपूर्वी त्याच्या बंधूचेही विहिरीत पडून निधन झाले होते. त्यामुळे कुटुंबाची पूर्ण जबाबदारी सतीश याच्यावरच होती.

मात्र सतीशचे दुःखद निधन झाल्याने गावात व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. येवला तालुका पोलीस स्टेशन मध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Nashik News: निमगाव मढ येथे शेततळ्यात पडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
Nashik Fire Accident: माळेदुमाळा येथे आग लागून घरासह धान्य व साहित्याचे नुकसान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com