Nashik : मार्केट यार्ड हाणामारीतील तरुणाचा मृत्यू

Nashik Crime News
Nashik Crime News esakal

मालेगाव (जि. नाशिक) : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्ड (market yard) गेटसमोर १ जुलैला झालेल्या हाणामारीत हॉकी स्टीकने डोक्यावर, पायावर झालेल्या जबर माराने अत्यवस्थ झालेल्या विजय पुंडलिक बागूल (वय ३५, रा. संविधाननगर, भायगाव) या तरुणाचा नाशिक येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू (Death) झाला. यानंतर विजय बागूलच्या खून प्रकरणी कॅम्प पोलिस ठाण्यात दोन अनोळखींविरुद्ध आकाश जगताप (वय २६, रा. शिवाजीनगर) याच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Young man killed in market yard clash Nashik Crime news)

Nashik Crime News
Nashik : बिबट्याच्या हल्ल्यात मुलगा जखमी

मार्केट यॉर्डसमोरच झालेल्या या हाणामारी प्रकरणी यापूर्वी कॅम्प पोलिस ठाण्यात ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. विजय बागूल याला १ जुलैला मार्केट यार्डसमोरील गणेश ऑटो गॅरेजच्या टपरीजवळ दोघा अनोळखींनी हॉकी स्टीकने जबर मारहाण केली. त्याच्या डोक्यावर, पायावर वार होते. खासगी रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर ४ जुलैला त्याला उपचारासाठी भाचा आकाश जगताप याने नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना मंगळवारी (ता. ५) विजयचा मृत्यू झाला. त्यानंतर कॅम्प पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एस. एच. देशमुख तपास करीत आहेत. विजयला मारहाण करणारे अनोळखी होते. मारहाणीचा उद्देश व कारण काय, याविषयीदेखील निश्‍चित माहिती नाही. त्यामुळे पोलिसांना या खुनाचा तपास आव्हान ठरणार आहे.

Nashik Crime News
मालेगाव तालुक्याच्या विकासासाठी निर्णय, आम्ही शिवसैनिकच : दादा भुसे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com