esakal | दुर्दैवी! नोकरी करून कुटुंबाला सुख द्यायचं एवढचं तर स्वप्न होतं रोहितचं; पण नियतीला नव्हतं मान्य
sakal

बोलून बातमी शोधा

rohit pachore young.jpg

अनेकांनी कोरोनाचा ज्वर ओसरण्यापर्यंत वाट बघण्याचे ठरवले आहे. या सगळ्यात रोजची कमाई बुडणाऱ्या कामगारांपुढे उभा राहिलेला आर्थिक प्रश्न सोडवण्याचे आव्हान असणार आहे. अशातच एका युवा कामगाराच्या बातमीने साऱ्यांनाच धक्का बसला आहे.

दुर्दैवी! नोकरी करून कुटुंबाला सुख द्यायचं एवढचं तर स्वप्न होतं रोहितचं; पण नियतीला नव्हतं मान्य

sakal_logo
By
राजेंद्र अंकार

नाशिक / सिन्नर : कोरोनामुळे वेगवेगळ्या व्यवसायावर परिणाम झालेला दिसत आहे. विशेषत: सध्या विविध सण, उत्सव सुरू आहेत. त्यात कोरोनाच्या भीतीने कामगारांना रोजगारासाठी धडपडावे लागत आहे. मंडप, लाईट, साऊंड व्यावसायिकांनी सध्या दोन पावले मागे येऊन कोरोनाचा ज्वर ओसरण्यापर्यंत वाट बघण्याचे ठरवले आहे. या सगळ्यात रोजची कमाई बुडणाऱ्या कामगारांपुढे उभा राहिलेला आर्थिक प्रश्न सोडवण्याचे आव्हान असणार आहे. अशातच एका युवा कामगाराच्या बातमीने साऱ्यांनाच धक्का बसला आहे.

असा घडला प्रकार

रोहित ऊर्फ बबन हिरामण पाचोरे (वय २५) असे त्याचे नाव आहे. माळेगाव येथील औद्योगिक वसाहतीतील हिंदुस्थान नॅशनल ग्लास या कंपनीत गेल्या काही महिन्यांपूर्वीच हा युवक कंत्राटी पद्धतीवर कामाला लागला होता. पण सोमवारी घडलेल्या घटनेने कंपनीत खळबळ माजली. सकाळी नेहमीप्रमाणे तो कामावर गेला. पण थोड्या वेळाने तो कंपनीच्या वेअर हाउसच्या उंचावरच्या अँगलला त्याने दोराने गळफास घेऊन आत्महत्या केलेला दिसला. या सर्व अचानक घडलेल्या प्रकाराने कर्मचाऱ्यांमध्ये धक्का बसला आहे. एका युवा कामगाराने असे टोकाचे पाऊल उचलल्याने कामगार वर्गात शोक व्यक्त केला जातोय.

हेही वाचा > पहाटेची वेळ...मंदिरात आश्रयाला थांबलेले गुराखी दुर्गंधीने अस्वस्थ; शोध घेताच बसला धक्का

कारण अद्यापही गुलदस्त्यातच
सिन्नर  तालुक्यातील भाटवाडी येथील तरुणाने माळेगाव येथील औद्योगिक वसाहतीतील कंपनीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता. २४) घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.  

हेही वाचा > भरचौकात 'त्याने' थेट वाहतूक पोलिसाच्याच श्रीमुखात भडकावली...नेमके काय घडले?

loading image
go to top