Latest Marathi News | झाडाला गळफास घेत युवकाची आत्महत्त्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Death News

Nashik : झाडाला गळफास घेत युवकाची आत्महत्त्या

नाशिक : नाशिकरोड येथील सायखेडा रोडवर युवकाने बाभळीच्या झाडाला गळफास घेत आत्महत्त्या केली. राकेश रामेश्वर रॉय (२८, रा. मकरंद कॉलनी, सायखेडा रोड, जेलरोड, नाशिक) असे मयत युवकाचे नाव आहे. (Youth committed suicide by hanging from tree Nashik Latest Marathi News)

हेही वाचा: Nashik : अज्ञात वाहनांच्या धडकेत बिबट्या जखमी; वनरक्षकावर हल्ला

राकेश याने गुरुवारी (ता. १०) राहत्या घराच्या पाठीमागे असलेल्या बाभळीच्या झाडाला रुमाल व हात रुमालाच्या सहाय्याने बांधून स्वत:ला गळफास लावून घेतला. गंगाधर रोकडे यांनी याबाबत पोलिसांना खबर दिली. राकेश यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकारयांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी उपनगर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून, आत्महत्त्येमागील कारण समजू शकलेले नाही.

हेही वाचा: Nashik : दुचाकीच्या धडकेत वृद्धा ठार