तरुणाईत वाढतेय शेअर बाजाराचे आकर्षण

पिंपळगावला दोन वर्षांत वाढले गुंतवणूकदार : खात्रीशीर उत्पन्नाचा मार्ग म्हणूनही पसंती
Share Market updates
Share Market updatesFile Photo

पिंपळगाव बसवंत : केद्र शासनाने आयात-निर्यातीबाबत राबविलेले धोरण, पायाभूत सुविधांना दिलेले प्राधान्य, आत्मनिर्भर भारत अंतर्गत उद्योजक व तरूणांसाठी घेतलेले निर्णय अशा विविध धोरण व कारणांमुळे भारतीय शेअर बाजार (SENSEX) वधारत चालला आहे. याचा फायदा अनेक गुंतवणूकदारांना (investors)होत आहे. आतापर्यत ठराविक लोकांची मक्तेदारी असलेल्या या व्यवसायात पिंपळगांव बसवंत सह परिसराती ग्रामीण भागातील लोकही उतरले आहे. तरूणाईमध्ये शेअर बाजाराची(share market) मोठी क्रेझ दिसत आहे. हातातील मोबाईलवरून शेअरची खरेदी विक्री होत असल्याने गुंतवणुकदारांची आकडेवारी झपाट्याने वाढते आहे. मुख्य कारण म्हणजे खात्रीशीर ठराविक उत्रन्नाचा मार्ग म्हणून याकडे पाहिले जात असून अनेक तरूणांनी यासाठी चक्क लाख ते अडीच लाखांपर्यतचे कोर्सेसलाही प्रवेश घेतला आहे.

Share Market updates
सावधान ! अमेरिकेत एकाच दिवशी १० लाखांपेक्षा अधिक जण कोरोनाबाधित

कोरोना काळात अनेकांचा रोजगार गेला. उत्पन्नाचे मार्ग बंद झाल्याने शेअर बाजारामधील ट्रेंडीग है पैसा मिळविण्याचे नवीन साधन बनू शकते, अशी तरूणाईची मानसिकता झाली आहे. त्यातून कमी भांडवलात त्यांनी हा पर्याय निवडला आहे. जे तरूण अभ्यासपूर्ण पध्दतीने या क्षेत्राकडे वळाले, त्यांना चांगला फायदा मिळत आहे. बाजाराचे ज्ञान न घेता त्यात उडी मारणलेले अनेक जण मात्र फाजील आत्मविश्‍वासाने ट्रेंडीग केल्याने तोंडावर आपटले आहेत.

Share Market updates
आजपासून ‘बुस्टर डोस’; अकोला जिल्ह्यात १२ हजार ५०० लाभार्थी पात्र

लॉकडाऊनच्या काळात ज्यांनी एंट्री केली, त्यांची गुंतवणुक दुप्पट-तिप्पट वाढली आहे. जे जास्त अवधीसाठी गुंतवणूक करतात, त्यांना हमखास नफा होतो, असे शेअर बाजाराचे सूत्र आहे. मात्र, अल्पज्ञानावर अधिक नफ्याच्या हव्यासाने फ्युचरचा पर्याय निवडतात, त्यांना तोटा होतो, असे तज्ञ सांगतात. या प्रकारच्या ट्रेंडींगमध्ये कमी कालावधीत, कमी वेळेत जास्त नफा मिळत असल्याने नवगुंतवणुकदार तिकडे वळण्याची शक्यता अधिक असते. राष्ट्रीयकृत बॅका आणि पतसंस्थांचे व्याजदर कमी झाल्याने गुंतवणुकदार शेअर बाजाराकडे वळल्याचे दिसून येत आहे. सोन्याच्या वाढीलाही ब्रेक लागला आहे. त्यामुळे म्युच्युअल फंड(mutual fund) पाठोपाठ शेअर बाजार तरूणाईला खुणावतो आहे.

पिंपळगांव शहरातील अनेक तरूण टिव्हीवर खेळ किंवा मनोरंजनाऐवजी शेअर बाजाराची अपटेड देणाऱ्या वाहिन्या बघतांना दिसत आहे. गेल्या दीड वर्षापासून शेअर बाजारात खरेदी-विक्री करतो आहे. नामांकीत कंपन्याचे शेअर्स दीर्घकाळासाठी घेतले तर निश्‍चित नफा मिळतो, हा माझा अनुभव आहे.

- सौरभ बोथरा, पिंपळगाव बसवंत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com