esakal | दोनवाडेत बिबट्याच्या हल्ल्यात युवक जखमी; घटनेनंतर परिसरात दहशत
sakal

बोलून बातमी शोधा

leopard.jpg

मोटारसायकलवरून गावाकडे जात असताना पोल्ट्री फार्मजवळ भक्ष्यासाठी दबा धरून बसलेल्या बिबट्याने सांगळे यांच्यावर हल्ला चढवून जखमी केले. बोराडे वस्तीवरील शेतकरी मदतीसाठी धावून गेल्याने बिबट्याने शिवारात पळ काढला.

दोनवाडेत बिबट्याच्या हल्ल्यात युवक जखमी; घटनेनंतर परिसरात दहशत

sakal_logo
By
वाल्मिक शिरसाट

नाशिक / देवळाली कॅम्प : दोनवाडे शिवारात मोटारसायकलवरून गावाकडे जाताना बिबट्याने एका युवकावर अचानक हल्ला चढवून जखमी केले. प्रसंगावधान राखून युवकाने आरडाओरडा केल्याने वस्तीवरील शेतकऱ्यांनी बिबट्याला पळवून लावले. जखमी युवकावर भगूरच्या खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर दोनवाडे शिवारात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.

बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी

शुक्रवारी (ता.२५) सायंकाळी सातच्या सुमारास संतोष सांगळे मोटारसायकलवरून गावाकडे जात असताना पोल्ट्री फार्मजवळ भक्ष्यासाठी दबा धरून बसलेल्या बिबट्याने सांगळे यांच्यावर हल्ला चढवून जखमी केले. बोराडे वस्तीवरील शेतकरी मदतीसाठी धावून गेल्याने बिबट्याने शिवारात पळ काढला. त्यांना भगूरला खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. हल्ल्यात जखमी झालेले सांगळे यांची तब्येत व्यवस्थित असल्याचे समजते. वन विभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.  

हेही वाचा > भीषण! ३५ हून अधिक मजुरांचा तो कानठळ्या बसविणारा आवाज; महामार्गावरील थरार

हेही वाचा > ३०हून अधिक कोविड रुग्णालये नाशिक शहरात रातोरात उभी! प्रशासनाचा खुलासा 

loading image
go to top