Nashik News: विहिरीत पडलेल्या मांजरींना युवकांनी दिले जीवदान

youth save life of cat fell in well nashik news
youth save life of cat fell in well nashik news

Nashik News: दोन जंगली मांजरी लढाई करताना थेट विहिरीत पडल्या...अन् दोघं विहिरीतील पाण्यात गारठले, पहाटेच्या सुमारास युवा शेतकऱ्याचे लक्ष विहिरीत गेले आणि शेतीशिवारातील तरूणांना बोलत दोघा जंगली मांजरी वाचविण्यासाठी युवकांनी शर्तीचे प्रयत्न सुरू केले.

विहिरीच्या कठड्यावर खाट पोहचताच मांजरीनी धुम ठोकली. जंगली मांजरांना जीवदान मिळाल्याने युवकांच्या चेहर्‍यावर आनंद झळकत होता.

शिवबाण फाट्यावरील राकेश देवरे शेतातील गट क्रमांक ४२७/१ मधील विहिरीत जंगली मांजरी लढाईत एकमेकांचा पाठलाग करीत असताना थेट विहिरीत पडल्या. (youth save life of cat fell in well nashik news)

पहाटेपासूनन परिसरात धुक्याची चादर पसरली होती. युवा शेतकरी राकेश देवरे सकाळी शेतात फेरफटका मारत असताना अचानक विहिरीत आवाज येत असल्याने त्यांनी डोकावून पाहिले असता, बिबट्याची दोन पिल्ले पडल्याचा भास झाला. श्री. देवरे यांनी तातडीने आजूबाजूस असलेल्या मित्रांना भ्रमणध्वनीवर माहिती दिली.

काही वेळातच विहिरीजवळ पडलेली पिल्ले पाहण्यासाठी गर्दी जमली होती. वनविभागाच्या कर्मचाऱ्याने बिबट्याची पिल्ले नसल्याची खात्री दिली. धुके कमी झाल्यानंतर जंगली मांजरी असल्याचे निदर्शनास आले. उपस्थित युवकांनी तातडीने खाटेला (बाज) दोरखंड बांधून मांजरी वाचविण्यासाठी धडपड सुरू केली.

youth save life of cat fell in well nashik news
Nashik Milk Rate Fall: दूधाचे दर घटल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत! कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना होतेय कसरत

मांजरीजवळ खाट पोहचताच दोघांनी खाटेवर ताबा बसवला. युवकांनी विहिरीतील खाट कठड्यावर आणताच दोघी जंगली मांजरींनी जंगलाच्या दिशेने धुम ठोकली. यावेळी मदतकार्यसाठी शिवबाण ग्रुपचे नितिन भामरे, भुषण भामरे, दिनेश कोर, भुषण कोर, विशाल कोर, प्रविण देवरे, बळवंत देवरे, हेमंत देवरे, पंकज देवरे, राकेश देवरे, रोहित कोर, पितांबर देवरे, रामदास देवरे यांनी सहकार्य केले.

बिबट्याचीही दहशत

या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याची दहशत असल्याचे युवकांनी सांगितले. बिबट्याचे दर्शन कायम होत असून ब-याच पाळीव जनावरांवर रात्रीतून हल्ले वाढत आहेत. शेतात फेरफटका मारत असताना नेहमीच पावलाचे ठसे निदर्शनास येत असतात. बिबट्याचे वास्तव्य असल्या कारणावरून विहिरीत बिबट्याचे पिल्ले पडल्याचा अंदाज येत होता. त्यातच दाट धुके असल्याने जंगली मांजरीची विहिरीतून सुटका करण्यासाठी अडथळा निर्माण होत होता. 

youth save life of cat fell in well nashik news
Nashik Agriculture: सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णसंख्येत वाढ! मानवी आरोग्यावर परिणाम; रब्बी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com