esakal | खाकीसाठी धावली तरुणाई...!पोलिसांच्या मदतीला तरुण स्वखुशीने रस्त्यावर 
sakal

बोलून बातमी शोधा

nashik police training 123.jpg

कोरोनामुळे संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू आहे. तरीही नागरिक कायद्याचा भंग करत घराबाहेर पडत आहेत. खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात झुंबड उडत आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिस फौजफाटा काही प्रमाणात कमी पडत असल्याचे चित्र आहे. पोलिसांवर मोठ्या प्रमाणात कामाचा ताण जाणवत आहे. अशातच पोलिस कर्मचाऱ्यांना सुटी मिळणेही दुरापास्त झाले आहे. यावर उपाय म्हणून अंबड पोलिस ठाण्यातर्फे नामी शक्कल लढविण्यात आली आहे. कोरोनाजन्य परिस्थितीत स्वतःहून पोलिसांना मदत करावी, अशी इच्छा असणाऱ्या युवकांची निवड करण्यात आली. त्यांना "विशेष पोलिस अधिकारीपदाचा' दर्जा देण्यात आला असून, त्यांना टी-शर्ट, शिटी व मास्कवाटप करण्यात आले. दररोज आठ तास कामाची वेळ ठरविण्यात आली आहे. 

खाकीसाठी धावली तरुणाई...!पोलिसांच्या मदतीला तरुण स्वखुशीने रस्त्यावर 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक/ सिडको : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांवरील कामाचा ताण कमी व्हावा या उद्देशाने त्यांना मदतनीस म्हणून 50 तरुणांची निवड करण्यात आली. त्यांना अंबड पोलिसांतर्फे विशेष पोलिस अधिकारीपदाचा दर्जा देत टी-शर्ट, शिटी व मास्कवाटप करण्यात आले. हे सर्व जण खाकी वर्दीतील पोलिसांना बंदोबस्ताच्या ठिकाणी मदत करणार आहेत. 

अंबड पोलिसांतर्फे 50 मदतनिसांना विशेष पोलिस अधिकारीपदाचा दर्जा;
कोरोनामुळे संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू आहे. तरीही नागरिक कायद्याचा भंग करत घराबाहेर पडत आहेत. खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात झुंबड उडत आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिस फौजफाटा काही प्रमाणात कमी पडत असल्याचे चित्र आहे. पोलिसांवर मोठ्या प्रमाणात कामाचा ताण जाणवत आहे. अशातच पोलिस कर्मचाऱ्यांना सुटी मिळणेही दुरापास्त झाले आहे. यावर उपाय म्हणून अंबड पोलिस ठाण्यातर्फे नामी शक्कल लढविण्यात आली आहे. कोरोनाजन्य परिस्थितीत स्वतःहून पोलिसांना मदत करावी, अशी इच्छा असणाऱ्या युवकांची निवड करण्यात आली. त्यांना "विशेष पोलिस अधिकारीपदाचा' दर्जा देण्यात आला असून, त्यांना टी-शर्ट, शिटी व मास्कवाटप करण्यात आले. दररोज आठ तास कामाची वेळ ठरविण्यात आली आहे. 

बंदोबस्तात करणार मदत 
गुरुवारी (ता. 26) अंबड पोलिस ठाणे परिसरात या "विशेष पोलिस अधिकारी' वर्गाला प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये गर्दीवर नियंत्रण कसे आणायचे, नागरिकांशी बोलण्याची पद्धत, संशयितांवर कशा प्रकारे लक्ष ठेवायचे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. हा उपक्रम संपूर्ण पोलिस ठाण्यांमध्ये राबविला जावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. 

हेही वाचा >PHOTOS : "बापरे! जर्मन नागरिकांचे नाशिकमध्ये काय काम?" नागरिकांमध्ये अचानक खळबळ

पोलिसांच्या मदतीला तरुण स्वखुशीने रस्त्यावर
संचारबंदीत पोलिसांना मदत व्हावी या उद्देशाने बहुतांश तरुण इच्छुक आहेत. या अनुषंगाने सद्यःस्थितीत अंबड पोलिस ठाणे हद्दीत एकूण 50 युवकांना संधी देण्यात आली असून, त्यांची मदत होणार आहे. वर्तणूक बघूनच त्यांची निवड करण्यात आली. त्यांना कुठल्याही प्रकारचे मानधन अद्यापपर्यंत निश्‍चित करण्यात आले नाही. -कुमार चौधरी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अंबड ठाणे

हेही वाचा > COVID-19 : 'शहराने पैसे कमवायला शिकवलं अन् गावाने निरोगी आरोग्य सांभाळायला!'...नोकरदार गावाकडे परतले