नाशिक : शहरात ८ जानेवारीला युवासेनेचे राज्यव्यापी अधिवेशन

नाशिक : शहरात ८ जानेवारीला युवासेनेचे राज्यव्यापी अधिवेशन

वरूण सरदेसाई : दोनदिवसीय अधिवेशनात आगामी निवडणुकांची ठरणार रणनीती

नाशिक : युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांचे राज्यव्यापी अधिवेशन ८ व ९ जानेवारीला नाशिकला(nashik) होत आहे. राज्यातील आगामी महापालिका(nashik carporation), जिल्हापरिषद (nashik jilha parishad)आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या मेळाव्याला विशेष महत्त्व असून, या वेळी या निवडणुकांचा बिगुलही वाजण्याची शक्यता आहे. दरम्यान, अधिवेशनाच्या तयारीबाबत युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई(varun sardesai) यांनी नाशिकला(nashik) भेट देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले व अधिवेशन यशस्वी करण्याचे आवाहन केले.

युवा सेनाप्रमुख तसेच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे(aditya thakrey), उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार संजय राऊत(sanjay raut), नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, परिवहनमंत्री अनिल परब, कृषीमंत्री दादा भुसे, गुलाबराव पाटील यांच्यासह प्रियांका चतुर्वेदी(priyanaka chaturvedi) आदी अधिवेशनास उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. ९ तारखेला होणाऱ्या अधिवेशनाच्या पहिल्या सत्राचे उद्‌घाटन एकनाथ शिंदे करतील. समारोप संजय राऊत यांच्या भाषणाने होईल. दुसऱ्या सत्राचा शुभारंभ सुभाष देसाई करतील, तर अधिवेशनाचा समारोप आदित्य ठाकरे यांच्या भाषणाने होईल. युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांसाठी एकप्रकारे ही पर्वणीच आहे. आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या शिरावर मोठी जबाबदारी येणार आहे. ती पार पाडण्यासाठी ही फळी किती तत्पर आणि तयार आहे याची चाचपणीही अधिवेशनात होणार आहे, असे वरुण सरदेसाई यांनी भाषणात सांगितले.

डॉ. अब्दुल कलाम कन्व्हेन्शन सेंटर, नानांच्या मळ्याजवळ, पपया नर्सरी (सातपूर) येथे होणाऱ्या मेळाव्यास राज्यभरातून युवा सेनेचे दोन हजार पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. वरुण सरदेसाई यांनी या वेळी अधिवेशन स्थळाची पाहणीही केली. अधिवेशन यशस्वितेसाठी कसोशीने प्रयत्न करू, असे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सांगितले. शालिमार येथील कार्यालयात आयोजित बैठकीस संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, युवासेना कोषाध्यक्ष व नगरसेवक अमेय घोले, सुप्रदा फातरपेकर, युवासेना विस्तारक सिद्धेश शिंदे, अजिंक्य चुंभळे, युवासेना जिल्हाधिकारी दीपक दातीर, राहुल ताजनपूरे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. वरुण सरदेसाई यांनी नंतर पोलिस आयुक्त दीपक पांडे यांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर नाशिकमधील कायदा व सुव्यवस्था, तसेच इतर अन्य प्रश्नांवर चर्चा केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com