Nashik : चौकशीच्या चक्रात झाकिर हुसेन रुग्णालय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dr zakir hussain hospital

Nashik : चौकशीच्या चक्रात झाकिर हुसेन रुग्णालय

नाशिक : कायम काही न काही कारणाने चर्चेत राहणारे पण कधीच कारवाई न होणाऱ्या कठडा येथील झाकिर हुसैन रुग्णालयात (Zakir Hussain Hospital) आणखी एका चौकशीची भर पडली आहे. रुग्णालयाची सुरवातच ही आंदोलनाने झाली. वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता, रुग्णांकडे दुर्लक्ष, औषध फवारणीवरून रूग्णालय गाजले. आंदोलनाचे इशारे दिल्यानंतर प्रशासन हलले आणि रूग्णालय चालू झाले. वर्षभरापूर्वी ऑक्सिजन गळतीमुळे २२ जणांनी प्राण गमावले होते.

हा प्रकार राज्यभर गाजल्यानंतर चौकशीचा खटाटोप करण्यात आला. वर्ष उलटूनही अद्याप कुणावरही कारवाई झाल्याचे दिसले नाही. हा प्रश्न असतानाच पुन्हा या रुग्णालयात धक्कादायक प्रकार समोर आला आला. या ठिकाणी चित्रीकरणाला परवानगी दिली गेली, रुग्णसेवेऐवजी चित्रीकरणाला परवानगी देण्यात आली. एकीकडे चित्रीकरण, तर दुसरीकडे रुग्णालयात काही कर्मचाऱ्यांनी इमर्जन्सी वॉर्डमध्येच उघडपणे मद्यपान केले. प्रकरणी मनपा आयुक्त रमेश पवार (NMC Commissioner ramesh pawar) यांनी आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. आणखी एक विषय डॉ. नागरगोजे यांच्या चौकशीत फाइल बंद झाला.