esakal | नाशिक जिल्ह्यातील १६ कोविड केअर सेंटर बंद
sakal

बोलून बातमी शोधा

कोविड सेंटर

नाशिक जिल्ह्यातील १६ कोविड केअर सेंटर बंद

sakal_logo
By
कुणाल संत

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत कमालीची घट झाल्याने जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे सुरू करण्यात आलेले १६ कोविड केअर सेंटर बंद करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. आरोग्य विभागातर्फे केवळ सिन्नरमधील इंडियाबुल्स कोविड उपचार केंद्रच सुरू ठेवण्यात येणार आहे.

जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने मार्च २०२१ मध्ये जिल्हा परिषद आरोग्य विभागाने जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने एकूण २७ कोविड केअर सेंटर सुरू केली होती. तसेच सुमारे एक हजार ९५० कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्तीही केली होती. दुसऱ्या लाटेचा जोर काहीसा कमी होऊन बाधितांची संख्या कमी होत असताना, मेमध्ये दहा कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले. आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागल्याने आणि अनेक रुग्ण घरीच उपचार घेत असल्याने इतर कोविड केअर सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्याच्या आरोग्य विभागाने रुग्ण दाखल नसलेले उपचार केंद्र ३१ ऑगस्टपासून बंद करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सिन्नरमधील इंडियाबुल्स काेविड केअर सेंटर वगळता इतर सर्व १६ केंद्रे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा: PHOTOS : बैलाच्या पाठीवर रंगले राजकारणाचे प्रतिबिंब

हेही वाचा: नाशिक जिल्ह्यातील १२९ पैकी ८३ कोरोना बाधित ग्रामीणमधील

loading image
go to top