Nashik Election News : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीचे वेध! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

election

Nashik Election News : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीचे वेध!

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : निफाड तालुक्यातील वीस ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी आटोपल्यानंतर आता जिल्हा परिषदपंचायत समितीच्या निवडणुकांचे इच्छुकांना वेध लागले आहेत. ग्रामपंचायतीत सरपंच व सदस्य म्हणून निवडून आलेल्यांसह इतर इच्छुकांनी पूर्वतयारी सुरू केली आहे.

दरम्यान, या निवडणुका कोणत्या पुनर्रचना व आरक्षणानुसार होणार याबाबत सर्वच पक्षांतील इच्छुकांमध्ये संभ्रमावस्था आहे. या निवडणुकांसंदर्भात राज्य निवडणूक आयोग कधी घोषणा करते याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. (Zilla Parishad Panchayat Samiti Elections Nashik Election News)

निफाड तालुक्यात दहा जिल्हा परिषद गट व वीस पंचायत समितीचे गण आहेत. सदस्यांचा कालावधी संपून आता एक वर्षाचा कालावधी होत आहे. सहा महिन्यांपूर्वी नव्याने गट, गण रचना झाली. त्यानुसार आरक्षण जाहीर झाले. इच्छुकांनी तयारी करून गुडघ्याला बांशीग बांधले होते.

पण महाविकास आघाडी सरकारच्या गट, गण वाढीच्या पुर्नरचनेबरोबरच आरक्षणास स्थगिती देण्यात आली. २०१७ मधील गट, गण संख्या कायम राहील असे घोषित करण्यात आले. त्यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही निवडणुका थांबल्या होत्या. एक वर्ष कालावधी उलटूनही निवडणुकीबाबत कोणत्याच हालचाली दिसत नाही.

हेही वाचा: Yeola Water Scarcity : येवला शहराला 4 दिवसाआड पाणीपुरवठा!

पक्षांतर करून निवडणुकीची मोर्चेबांधणी

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या होणारी निवडणूक या जुन्या संख्येनुसार की नव्याने झालेल्या पुर्नरचनेनुसार यामुळे इच्छुकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. राज्य निवडणूक आयोगाचा कोणता निर्णय होतो व निवडणुका जाहीर होतात, याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.

दुसरीकडे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकांना आपल्याला उमेदवारी मिळण्याचे संकेत नसल्याने अशांनी पक्षांतर करून निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

हेही वाचा: Nashik News : वाढत्या मजुरीला लागणार यांत्रिक पेरणीमुळे ब्रेक!

पदाधिकाऱ्यांनी चाचपणी

अद्याप आरक्षणाच्या अंतिम निर्णय प्रलंबित असला तरी अनेकांनी मागील काळात घोषित करण्यात आलेल्या आरक्षणानुसार तयारी सुरू केलेली आहे. इच्छुक ग्रामपंचायत निवडणुकीत या निवडणुकीची चाचपणी करताना आढळून आले.

मिनी मंत्रालय म्हणून समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेला मिळणारा निधी पाहता सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मात्र, निवडणूक आयोग या निवडणुकीसंदर्भात काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: NMC Eastern Divisional Office : कार्यालय स्थलांतराची घाई, कामास मात्र सापडेना मुहूर्त!