zp nashik
zp nashikesakal

Nashik ZP Exam Result : विस्तार अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक परिक्षेचा निकाल घोषित

आरोग्य पर्यवेक्षक या पदांच्या परीक्षेचा निकाल आयबीपीएसकडून प्राप्त झाल्यानंतर शनिवारी (ता.२०) मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मान्यतेने जाहिर करण्यात आला.

Nashik ZP Exam Result : ग्राम विकास विभागाच्या मान्यतेने झालेल्या विस्तार अधिकारी (सांख्यिकी) आणि आरोग्य पर्यवेक्षक या पदांच्या परीक्षेचा निकाल आयबीपीएसकडून प्राप्त झाल्यानंतर शनिवारी (ता.२०) मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मान्यतेने जाहिर करण्यात आला. (ZP Extension Officer Health Supervisor Exam Result Declared nashik news)

निकाल नाशिक जिल्हा परिषदेच्या https://zpnashik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्याची माहिती सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली.

जिल्हा परिषदेने ५ ऑगस्ट २०२३ रोजीच्या जाहिरातीनुसार विस्तार अधिकारी (सांख्यिकी) या पदाच्या दोन जागांसाठी ८ ऑक्टोंबर २०२३ रोजी आयबीपीएस (इंस्टीट्युट ऑफ बँकींग पर्सोनेल सिलेक्शन, मुंबई) या संस्थेमार्फत ऑनलाईन परीक्षा घेतली होती.

zp nashik
ZP Bharti Exam : 460 उमेदवारांनी दिली परीक्षा; 313 परीक्षार्थींनी मारली दांडी

या परीक्षेला ३०० परीक्षार्थी उपस्थित होते. त्यापैकी २०० गुणांच्या परीक्षेत किमान ४५ टक्के म्हणजे ९० गुण प्राप्त करणाऱ्या २२१ परीक्षार्थींचा निकाल घोषित झाला आहे. तसेच आरोग्य पर्यवेक्षक या पदाच्या तीन जागांसाठी १० ऑक्टोंबर २०२३ रोजी ७३ जणांची ऑनलाइन परीक्षा झाली होती.

यात ९० गुण प्राप्त करणाऱ्या २२ परीक्षार्थींचा निकाल घोषित केला आहे. परीक्षा सुरळीतसाठी पोलिस आयुक्त, नाशिक व पोलिस अधीक्षक (ग्रामीण) यांच्याकडून बंदोबस्त देण्यात आला होता. परीक्षेच्या दिवशी अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी यांच्याकडून अखंड वीज पुरवठा झाला होता.

तसेच जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडून परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी ॲम्ब्युलन्स उपलब्ध करुन दिल्या होत्या. सर्व परीक्षा सुरळीतपणे पार पाडल्याची माहिती परदेशी यांनी दिली.

zp nashik
Nashik ZP Bharti Exam: जि.प. पदभरतीसाठी 18 पासून परीक्षा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com