Nandurbar NCP Crisis : राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. मोरे दादा गटात दाखल

Nandurbar District President of NCP while felicitating the Deputy Chief Minister Ajit Pawar. Abhijit More and activists.
Nandurbar District President of NCP while felicitating the Deputy Chief Minister Ajit Pawar. Abhijit More and activists. esakal

Nandurbar NCP Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अचानक घडलेल्या घडामोडींमुळे कन्फ्यूज असलेले नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांच्यासह युवकचे प्रदेश सरचिटणीस ॲड. राऊ मोरे व युवकचे जिल्हाध्यक्ष, महिला जिल्हाध्यक्षांसह जिल्ह्यातील शेकडो पदाधिकारी, पक्षाचे प्रांतिक सदस्य, कार्यकर्ते यांनी अखेर अजितदादा गटात जाण्याचा निर्णय घेत प्रत्यक्षात दादा गटात दाखल झाले आहेत.

त्यामुळे साहेब गटात आता बोटावर मोजण्याइतपत पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्ह्यात शिल्लक राहिल्याचे चित्र आहे. (NCP District President Dr More Joined ajit pawar ncp group nandurbar news)

रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांसह भाजप-शिवसेनेचा मंत्रिमंडळात समाविष्ट झाले. त्यामुळे राष्ट्रवादीतही शिवसेनेच्या पुनरावृत्तीचा अनुभव राज्यातील जनतेला आला. काका-पुतण्यातच पक्षाचे दोन गट पडले. त्यामुळे राज्यातील सारेच अचंबित झाले होते. त्याला नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस व पदाधिकारीही अपवाद नाहीत.

त्या दिवशी जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांच्यासह त्यांचे पदाधिकारीही कन्फ्यूज झाले होते. त्यांनाही काहीही सुचत नव्हते. त्यामुळे त्यांना कोणत्या गटासोबत जावे हे सुचेनासे झाले होते. कारण पवार कुटुंब आणि नंदुरबारचे मोरे कुटुंब यांचे कौटुंबिक संबंध आहेत. त्यांच्यासाठी शरद पवार (साहेब) यांच्यासोबतच अजित पवार (दादा)ही तेवढेच आदराचे व महत्त्वाचे आहेत. मात्र सध्या यंग जनरेशनचा विचार केल्यास त्यांचे अजितदादांशी राजकीय संबंध जास्त होतात.

या सर्व बाबींचा विचार करीत भावी राजकीय भवितव्याचा विचार करून अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांनी त्यांच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून सर्वानुमते दादांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. बुधवारी (ता. ५) मुंबई येथील अजित पवार यांच्या मेळाव्यास शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह जाऊन नूतन उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा सत्कार करून अभिनंदन केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nandurbar District President of NCP while felicitating the Deputy Chief Minister Ajit Pawar. Abhijit More and activists.
Sharad Pawar NCP : सर्व कार्यकर्त्यांसह मी शरद पवार यांच्यासोबत; माजी आमदार प्रदीप नाईक

तसेच आम्ही नंदुरबारकर तुमच्यासोबत असल्याची जाहीररीत्या ग्वाही दिली. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ॲड. राऊ मोरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सीताराम पावरा, महिला जिल्हाध्यक्षा अश्‍विनी जोशी, प्रदेश सदस्य निखिल तुरखिया, मधुकर पाटील यांच्यासह जिल्ह्यातील शेकडो पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी दादांसोबत असल्याचे जाहीर केले आहे.

साहेबांसोबतही एक गट

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार (साहेब) यांच्यासोबतही जिल्ह्यातील एक गट आहे. मात्र त्यातील संख्या सध्या कमी आहे. भविष्यात हा गटही सक्रिय होऊन साहेब गटाची बांधणी करू शकतो. त्यात असलेला गट हा माजी मंत्री तथा आमदार एकनाथ खडसे समर्थक आहे. श्री. खडसे शरद पवारांसोबत आहेत.

त्यामुळे त्यांचे खंदे समर्थक असलेले माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष उदेसिंग पाडवी हे पवार गटातच आहेत. त्यांच्यासोबत तळोद्यातील नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, केसरसिंग क्षत्रिय, संदीप परदेशी, पुंडलिक राजपूत, योगेश मराठे, कमलेश पाडवी आदींचा समावेश आहे.

Nandurbar District President of NCP while felicitating the Deputy Chief Minister Ajit Pawar. Abhijit More and activists.
NCP Crisis : पवारांचं एक पाऊल मागे! महत्वाचा दौरा सोडून मुंबईला परतणार; दिलं 'हे' कारण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com