कोट्यवधी रुपये खर्च करूनही कुपोषणाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ?

malnutrition
malnutritionesakal

जळगाव : जिल्ह्यामध्ये कुपोषणाची (malnutrition) संख्या वाढत आहे. जळगाव (jalgaon) जिल्ह्यात सरकार कोट्यवधी रुपये खर्च करूनही योग्य त्या लाभार्थ्यांपर्यंत पोषण आहार पोहचत नाही. गर्भवती मातांना योग्य तितका आहार मिळत नसल्याने जिल्ह्यातील कुपोषणाची संख्या वाढली आहे. जिल्ह्यात ९७३ बालके ही कुपोषित आहे, अशा बालकांना जास्तीत जास्त अन्न मिळण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या असल्याची माहिती राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी दिली.

कुपोषणाच्या विषयावर फोकस

राज्य अन्न आयोगाचे (State Food Commission) अध्यक्ष ढवळे (Chairman Mahesh Dhawale) सोमवारी (ता.२३) जिल्हा दौऱ्यावर होते. दौऱ्यात त्यांनी स्थानिक स्तरावरील नागरिकांशी संवाद साधून धान्य मिळते की नाही याची तपासणी केली. तसेच जिल्ह्यातील यावल, रावेर आणि चोपडा या तालुक्यातील कुपोषणाच्या परिस्थीचाही आढावा घेतला. ते म्हणाले की, कुपोषणाच्या विषयावर आम्ही फोकस केला असून जळगाव जिल्ह्यातील कुपोषण (Malnutrition) कमी करण्यासाठी काही उपाययोजना प्रशासनाला सुचविल्या आहेत.

malnutrition
सावधान ! मनपा आवारातील भंगार उठू शकते जिवावर

शाळांमध्ये खिचडी पुन्हा मिळणार

कोरोनामुळे शाळा बंद असल्याने गेल्या अडीच वर्षापासून विद्यार्थ्यांना शाळेत खिचडी मिळत नव्हती. गेल्या सहा महिन्यापासून ऑफलाइन शाळा सुरू झाल्या. मात्र विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळत नव्हता. मात्र आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या की लगेचच विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात अंतर्गत खिचडी वाटप करण्यात येणार आहे. असे श्री.ढवळे यांनी सांगितले. जिल्ह्यातील २७५३ शाळांमध्ये खिचडी वाटप पुन्हा होणार आहे.

malnutrition
‘मेमू ट्रेनच्या' कमी डब्यांमुळे प्रवाशांची होतेय गैरसोय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com