Nandurbar News : पारंपरिक वाद्य वाजविणाऱ्यांचा पोलिस दलातर्फे सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

on chtrapati shivaji maharaj jayanti Traditional instrument players felicitated by police force nandurbar news

Nandurbar News : पारंपरिक वाद्य वाजविणाऱ्यांचा पोलिस दलातर्फे सत्कार

नंदुरबार : पारंपरिक वाद्ये वाजवून नंदुरबार जिल्हा डीजे व डॉल्बीमुक्त करण्याचे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी केले होते. (on chtrapati shivaji maharaj jayanti Traditional instrument players felicitated by police force nandurbar news)

जिल्ह्यातील सार्वजनिक मंडळांनी पोलिस दलाच्या आवाहनास उत्तम प्रतिसाद देत पारंपरिक वाद्ये वाजवून नंदुरबार जिल्हा डीजेमुक्त व डॉल्बीमुक्त करण्याचा प्रयत्न केला होता. बुधवारी जागतिक महिला दिनानिमित्त १९ फेब्रुवारी २०२३ ला झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवात पारंपरिक वाद्य वाजवून जयंती उत्साहात साजरी करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

त्यात वसंत पाटील (अध्यक्ष, शिवजयंती उत्सव समिती, आष्टे), गुणवंत पाटील (अध्यक्ष, श्री छत्रपती शिवजयंती उत्सम समिती, वावद, ता.जि. नंदुरबार), प्रकाश पाटील (अध्यक्ष, शिवजयंती उत्सव समिती, नाशिंदे), राजेंद्र अग्रवाल (अध्यक्ष, शिवजयंती उत्सम समिती मंडळ, शहादा), उत्तम पाटील (अध्यक्ष, छत्रपती शिवजयंती उत्सव समिती, मोहिदा त.श., ता. शहादा), दीपराज धनगर (अध्यक्ष, शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थान ग्रुप म्हसावद, ता. शहादा) यांचा समावेश आहे.

नंदुरबार जिल्हा पोलिस दलातर्फे प्रशस्तिपत्र व पुष्पगुच्छ देऊन जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सत्कार केला. या वेळी अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, पोलिस उपअधीक्षक (मुख्यालय) विश्वास वळवी, नंदुरबार उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे, अक्कलकुवा उपविभागीय पोलिस अधिकारी संभाजी सावंत,

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, बालकल्याण समिती अध्यक्षा नीता देसाई, जिल्हा आरोग्याधिकारी गोविंद चौधरी, महिला व बालविकास अधिकारी कृष्णा राठोड, लायन्स क्लबच्या डॉ. तेजल चौधरी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

"उत्सवकाळात डॉल्बी, डीजेचा वापर करून ध्वनिप्रदूषण नियमाचे उल्लंघन केल्यास पर्यावरण संरक्षण कायद्याप्रमाणे पाच वर्षे कैद किंवा एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. शिक्षा होऊनसुद्धा असे गुन्हे केल्यास पाच हजार रुपये दंड प्रत्येक दिवसाला व शिक्षा लागल्याच्या एक वर्षापर्यंतच्या काळात पुन्हा असे गुन्हे केल्यास सात वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते, सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपकाचा उपयोग मर्यादेपेक्षा मोठ्या आवाजात करू नये."-पी. आर. पाटील, पोलिस अधीक्षक, नंदुरबारी