
Nandurbar Fire Accident : धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर टेम्पोला आग
Nandurbar Fire Accident : धुळे-सुरत महामार्गावरील कोंडाईबारी घाटाच्या खाली चौकी गाव शिवारात आयशर टेम्पोमध्ये सकाळी सहाला शॉर्टसर्किट झाल्याने केबिनमध्ये आग लागून टेम्पो जळून खाक झाल्याची घटना घडली. (On Dhule Surat National Highway Tempo fire due to short circuit nandurbar news)
या महामार्गावर दोन दिवसांपूर्वी ट्रकला आग लागन संपूर्ण ट्रक खाक झाला होता. त्यापाठोपाठ शुक्रवारी (ता. ९) आयशर टेम्पोला आग लागली असून, जून महिन्यात कडक उन्हाळ्यात वाहनांना आगी लागण्याच्या घटना महामार्गावर घडत आहेत.
सकाळी सहाला आयशर टेम्पो (एमएच १९, सीवाय ८५२०) गुजरातमधून खाली कॅरेट भरून धुळे येथे जात असताना टेम्पोमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण टेम्पोला आग लागली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
महामार्ग सुरक्षा पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक रवींद्र लोंडे, हवालदार अरुण सूर्यवंशी, दीपक चौधरी, खाटीक यांनी धाव घेतली.
आग नियंत्रणात आणण्यासाठी त्वरित साक्री येथील अग्निशमन बंब मागवून आग विझविण्यात आली. टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबाबत विसरवाडी पोलिस ठाण्यात माहिती दिल्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन पाटील, चालक राजू कोकणी, हवालदार हितेश पाडवी यांनी घटनास्थळी धाव घेतली.