बापरे! एका रात्रीत चक्क 'इतक्या' झिंगाटांवर केसेस! 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 1 January 2020

31 डिसेंबरनिमित्त सायंकाळपासूनच हॉटेल, रेस्टॉरंट आणि महामार्गालगतचे ढाबे गर्दीने फुलून गेले. हॉटेलमध्ये क्‍लब पार्ट्यांचे संयोजन करण्यात आले होते. पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये दुपारपासूनच पोलिस ठाणेनिहाय किमान दोन-तीन ठिकाणी नाकाबंदी करण्यात आलेली होती. मात्र, रात्री 10 नंतर नाकाबंदीमध्ये बदल करताना त्यात वाढही करण्यात आली.

नाशिक : मावळत्या वर्षाला निरोप अन्‌ नववर्षाच्या स्वागतासाठी सारे शहर सज्ज झालेले असताना, यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरभर पोलिसांचा कडेकोट पोलिस बंदोबस्त होता. विशेषत: मंगळवारी (ता. 31) दुपारनंतर शहरभर पोलिस ठाणेनिहाय नाकाबंदी केली. रात्री आठनंतर नाकाबंदीत वाढ करण्यात आली. सोमवारी (ता. 30) रात्री करण्यात आलेल्या नाकाबंदीमध्ये तब्बल 180 मद्यपींवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. 

रात्री 10 नंतर नाकाबंदीमध्ये वाढ... 

31 डिसेंबरनिमित्त सायंकाळपासूनच हॉटेल, रेस्टॉरंट आणि महामार्गालगतचे ढाबे गर्दीने फुलून गेले. हॉटेलमध्ये क्‍लब पार्ट्यांचे संयोजन करण्यात आले होते. पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये दुपारपासूनच पोलिस ठाणेनिहाय किमान दोन-तीन ठिकाणी नाकाबंदी करण्यात आलेली होती. मात्र, रात्री 10 नंतर नाकाबंदीमध्ये बदल करताना त्यात वाढही करण्यात आली. रात्री सुमारास कॉलेज रोड, गंगापूर रोड तरुणाईची गर्दी होती. शहरातील हॉटेले गर्दीने हाउसफुल झाल्याने उत्साही तरुणाईसह काही कुटुंबे वेटिंगवर होती. नववर्षाच्या स्वागतासाठी येणारे युवक-युवती, जोडप्यांसाठी विविध हॉटेले आणि रेस्टॉरंटनी खास सोय केली होती. 

प्रशासनाची रात्रभर कारवाई 
नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्‍वभूमीवर तळीरामांवर कारवाईसाठी शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. पूर्वसंध्येला शहर वाहतूक पोलिस शाखेच्या कर्मचाऱ्यांसह संबंधित पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांची चोख नाकाबंदी केली. मुंबई नाका, जेहान सर्कल, अंबड टी पॉइंट, कॅनडा कॉर्नर, मायको सर्कल, गंगापूर यांसह सुमारे 45 ठिकाणी नाकाबंदी होती. नाकाबंदीवेळी पोलिसांकडून दुचाकी व चारचाकी वाहनचालकांची तपासणी केली जात होती. 

हेही वाचा > पं.स.निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादीला 'इथे' दाखविला ठेंगा!

एका रात्रीत 180 मद्यपींवर कारवाई 
सोमवारी (ता. 30) रात्रीही पोलिसांनी शहरभर नाकाबंदी करीत मद्यपी वाहनचालकांविरोधात कारवाईचा बडगा उगारला. यात गेल्या वर्षभरात कारवाई करताना 256 मद्यपी वाहनचालकांवर कारवाई केली होती. सोमवारच्या कारवाईत तब्बल 180 मद्यपी वाहनचालकांविरोधात कारवाईचा बडगा उगारला गेला. त्यामुळे मंगळवारी (ता. 31) रात्रीही पोलिसांनी कारवाईसाठी कंबर कसली होती. 

हेही वाचा > छतावरुन आत्महत्या करण्यासाठी पाऊल पुढे टाकणार....तेवढ्यातच..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one eighty cases of alcoholism in one night nashik Marathi News