
रविवारी रात्री कुटुंबीयांनी जेवण केले. फुलमती अबिदला जेऊ घालतच होती. अचानक त्यांना पतीचा फोन आला. फोनवर बोलत बोलत अबिदची आई बाल्कनीत गेली. आईचे दुर्लक्ष असतानाच अबिद हा बाथरुममध्ये गेला. तेथे पाण्याने भरलेला टब होता.
नाशिक : एक वर्षाच्या बालकाचा पाण्याच्या भांड्यात पडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. बाथरुममधील टबमध्ये बुडून या एक वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. घडलेल्या घटनेनंतर कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे
बाळाला जेऊ घालत होती..पण पतीचा फोन आला अन् ती गेली
रविवारी (ता.१) रात्री कुटुंबीयांनी जेवण केले. फुलमती अबिदला जेऊ घालतच होती. अचानक त्यांना पतीचा फोन आला. फोनवर बोलत बोलत अबिदची आई बाल्कनीत गेली. आईचे दुर्लक्ष असतानाच अबिद हा बाथरुममध्ये गेला. तेथे पाण्याने भरलेला टब होता. त्यात पडून बुडून त्याचा मृत्यू झाला. अबिदच्या मृत्यूमुळे आईने एकच आक्रोश केला.या प्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. घडलेल्या घटनेनंतर शेख कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
तिची नुकतीच प्रसुती झाली होती...
पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, नाशिक-पुणे महामार्गावरील आंबेडकरनगर समोरील डीजीपीनगर येथे रविवारी ही घटना घडली.अबिद मोहित शेख (वय 1 वर्षे) याची मावशी डीजीपीनगर संतोषीमाता नगर येथील साईर कुटीर सोसायटीत राहते. तिची नुकतीच प्रसुती झाली. तिची बहीण फुलमती खातून ही आपला लहान मुलगा अबिदला घेऊन बहिणीच्या घरी गेली होती.
हेही वाचा > प्रसुतींच्या कळांनी बिथरली होती 'ती'...त्यातच तिला दिसला 'तो'
> भारत भ्रमणावेळी स्वामी विवेकानंदांचा पदस्पर्श झालेले हे गाव
> खिचडी खायला मिळणार म्हणून खूश होती मुले....पण त्यावेळी...