Water Crisis : अमरावती धरणात फक्त 30 टक्के जलसाठा शिल्लक!

only 30% water in dam
only 30% water in damesakal

दोंडाईचा (जि.धुळे) : मालपूर (ता. शिंदखेडा) येथील अमरावती धरणातील (Dam) पाण्याची रब्बी हंगामासाठी दोन आवर्तने सोडण्यात आली आहेत. त्यातून २५ टक्के जलसाठा कमी झाला आहे.(Only 30 percent water storage is left in Amaravathi Dam dhule news)

धरणात आता केवळ ३० टक्के जलसाठा शिल्लक असून, अजून एक आवर्तन सोडण्यात येणार आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची पातळी तळ गाठणार आहे. पाण्याचे योग्य पद्धतीने जतन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

जलाशयाच्या उपशातून व डाव्या-उजव्या कालव्यातून सोडलेल्या आवर्तनातून १६२ हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे, असे संबंधित विभागाने सांगितले. फेब्रुवारीअखेर शेवटचे तिसरे आवर्तन सोडण्यात येणार आहे, अशी माहिती अमरावती धरणाचे शाखा अभियंता पीयूष पाटील यांनी सांगितले.

यंदा अमरावती धरणात फक्त ४९ टक्के जलसाठा झाला होता. मागील वर्षी ९ टक्के साठा शिल्लक होता. असा एकूण ५५ टक्के जलसाठा असल्याने निम्मा खाली होता.

गहू पिकासाठी डिसेंबर-जानेवारी या दोन महिन्यांत प्रत्येकी एक आवर्तन सोडण्यात आले. रब्बी हंगामासाठी उजव्या कालव्यातून पाच दिवस, तर डाव्या कालव्यातून चार दिवस पाणी सोडण्यात आले. सुमारे ६२ हेक्टर जमीन सिंचनाखाली आली तर जलशय उपशातून शंभर हेक्टर सिंचन झाले आहे.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

only 30% water in dam
Dhule News : भुराबाई ठेलारींनी तोळाभर सोनपोत केली परत; संस्कारांचे मोल

धरणात शंभर टक्के भरल्यास दोन हजार ६०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊ शकते असे नियोजन आहे. अद्याप धरण पूर्ण क्षमतेने भरलेच नाही. यंदाच्या रब्बीसाठी दोन आवर्तनांतून २५ टक्के पाणी खाली होते.

त्यातून फक्त ६२ हेक्टर जमीन सिंचनाखाली येते. नेमके पाणी कुठे मुरते हे पाहिले पाहिजे. भविष्यात सर्वत्र सिंचनासाठी टाळमेळ कसा बसेल हा प्रश्न शेतकऱ्यांना आहे. कालव्यांचे सक्षमीकरण होणे गरजेचे आहे. पाण्याचा अपव्यय कुठे होतो हे संबंधित यंत्रणेला पाहावे लागेल

मोजमाप पट्टी अस्पष्ट

पाण्याची पातळी खाली गेली आहे. मोजमाप पट्टीवरील अंक अस्पष्ट असल्याने किती जलसाठा आहे हे योग्यरीत्या कळत नाही. त्यामुळे पाण्यातील मोजमाप पट्टी बसविण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

रब्बी हंगामासाठी तीन आवर्तने सोडण्याचे नियोजन आहे. यापूर्वी दोन वेळा पाणी सोडले आहे. सध्या धरणार ३० टक्के जलसाठा शिल्लक आहे. शेवटचे आवर्तन फेब्रुवारीअखेर देण्याचे नियोजन आहे. -पीयूष पाटील, शाखा अभियंता, अमरावती मध्यम प्रकल्प, मालपूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com