जागा विकत घेऊ, मात्र गरिबांना घरकुल देऊ

Padavi assures that they will provide their own housing to the poor
Padavi assures that they will provide their own housing to the poor

तळोदाः घरकुलांसाठी शहरालगतचे क्षेत्र विकत घेऊ मात्र गरिबांना हक्काचे घरकुल देऊ, अशी ग्वाही आदिवासी विकासमंत्री ॲड. के.सी.पाडवी यांनी आज तळोदा येथे आदिवासी संस्कृती भवनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलतांना दिली.

आदिवासी संस्कृतीचे जतन व्हावे, आदिवासी लोककलेला व्यापक स्वरूप मिळावे, आदिवासींना त्यांच्या हक्काची जागा प्राप्त व्हावी याकरिता आदिवासी उपयोजनेतून शहरातील सीतामाई नगर येथे साकारण्यात आलेल्या संस्कृती भवनांचा लोकार्पण सोहळा पालिकेच्या वतीने घेण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री पद्माकर वळवी, आमदार राजेश पाडवी,जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सीमा वळवी, प्रकल्प अधिकारी अविशांत पंडा आदी उपस्थित होते.

पुढे बोलतांना मंत्री श्री पाडवी म्हणाले की, डी.बी.टी प्रणालीबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी चर्चा करून विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल, तळोदा शहरात हक्काच्या घरकुलासाठी अडथळा ठरत असलेल्या जहागिरीदारीबाबत सकारात्मक चर्चा सूरु असून लवकरच घरकुलांचा प्रश्न मार्गी लागेल.

घरकुलासाठी केंद्राकडून १६३ कोटी निधी मंजूर आहे. जिल्हा परिषदेकडे देखील २२ कोटी निधी शिल्लक आहे. केंद्राकडून १६३ कोटी प्राप्त होताच जिल्हा परिषदेचा निधी देखील वर्ग करण्यात येईल. जि.प अध्यक्ष निवडतांना अनेकांची नाराजी ओढून घेतली. पद्माकर वळवी हे लढवय्ये नेतृत्व आहे. त्यामुळे त्यांचे पुनर्वसन करणे अत्यंत गरजेचे होते. लोकसभेत मते मागताना दिलेले आश्वासने पूर्ण करणार आहे.

जिल्ह्यात डोंगराळ भागात आदिवासी क्रीडा अकॅडमी उभारणार आहे. शहरी अथवा डोंगराळ भागात जमीन देणारे कोणी तयार असेल तर त्यास मोबदला देऊन त्याठिकाणी आदिवासी अकॅडमी व उद्यानचा प्रश्न मार्गी लागेल. २० वर्षानंतर काँग्रेसला आदिवासी विकास खाते मिळाले आहे. जिल्ह्यातील आमदार, खासदार यांची बैठक घेऊन डिबीटी योजनेत सुधारणा करणार असल्याचे सांगितले.

मंचावर मुख्याधिकारी सपना वसावा, नगराध्यक्ष अजय परदेशी, माजी उपनगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी, माजी नगराध्यक्ष भरत माळी, जि.प सदस्य सुहास नाईक, सभापती रतन पाडवी, नगरसेवक संजय माळी, सुभाष चौधरी, हितेंद्र क्षत्रिय, जितेंद्र माळी, काँग्रेस तालुका अध्यक्ष रोहिदास पाडवी, काँग्रेस जिल्हा युवा अध्यक्ष संदीप परदेशी, तळोदा प.स.सभापती यशवंत पाडवी, बांधकाम सभापती रामानंद ठाकरे, आरोग्य सभापती योगेश पाडवी, पाणी पूरवठा सभापती अमानुदिन शेख, आदी मान्यवर उपस्थित होते.


माझा काहीही संबध नाही
काल जि.प. विषय समिती सभापती निवडीदरम्यान झालेला प्रकार हा अपघात आहे .तो मी केलेला नाही. मी तत्वाशी जोडलेला आहे. कालच्या सभापतीनिवडी बाबतची घटना सदस्यांनी घडवून आणली असावी, असे म्हणत एक प्रकारे याबाबतचा खुलासाच त्यांनी केला. राजकारण सोडून विकास कामांना प्राधान्य देणे महत्वाचे आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com