Nandurbar : प्रवाशांचा बंद लालपरीला ‘दे धक्का’

passengers pushing MSRTC bus
passengers pushing MSRTC busesakal

तळोदा (जि.नंदुरबार) : परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बसमध्ये अचानक बिघाड झाल्याने बस तळोद्यातील भररस्त्यात अचानक बंद पडली. बस चालू करण्यासाठी चक्क प्रवाशांना खाली उतरून बसला धक्का (Push) मारावा लागला, मात्र बस चालू झाली नाही. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. बंद बस शहरातील गजबजलेल्या स्मारक चौकात तब्बल साडे तीन तास उभी राहिल्याने, वाहतुकीवर त्याच्या विपरित परिणाम होत परिसरातील व्यापारांना त्याचा त्रास सहन करावा लागला. (Passengers push to MSRTC Bus in Nandurbar news)

बस शहरातील सर्वात गजबजलेल्या स्मारक चौकात बंद पडल्याने वाहतुकीवर त्यांचा विपरीत परिणाम झाला. सोमवारी (ता. २०) रोजी तळोद्यात प्रवाशांना तोंड द्यावे लागले. दुपारी १२ वाजेच्या सुमारास नंदुरबार - तळोदा बस (एमएच ०६ एस ८५३८) शहरातील स्मारक चौकात येवून अचानक बंद पडली. बस चालकाने बस चालू करण्यासाठी भरपूर प्रयत्न केलेत, मात्र बस चालू झाली नाही. त्यामुळे बसमधील प्रवाशांना चक्क बसला चालू करण्यासाठी धक्का मारावा लागला. तरी बस चालू झाली नाही, त्यामुळे प्रवाशांनी तेथून पुढे पायीच जाणे पसंत केले. जवळपास तीन तासानंतर साडे तीन वाजेच्या सुमारास परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी व नागरिकांनी बंद पडलेल्या बसला अक्षरशः धक्का मारत तळोदा बस स्थानकात नेले.

passengers pushing MSRTC bus
नवलनगरच्या सायकल दुकानदाराची अमळनेरात आत्महत्या

दरम्यान जिल्ह्यातील अनेक बसची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे प्रवाशी टॅक्सीला व इतर वाहनांना प्राधान्य देत आहेत आणि त्याच्या फटका बसला पर्यायाने परिवहन महामंडळाला बसत आहे. ज्येष्ठ नागरिकांना नाहक त्याचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे जिल्ह्यातील बसेस मध्ये दुरुस्ती करीत प्रवाशांना चांगल्या बसेस उपलब्ध करुन द्याव्यात अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

passengers pushing MSRTC bus
Jalgaon : वर्गात शिकवत असतानाच शिक्षकाचा हृदयविकाराने मृत्यू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com