Nandurbar News: कोविड काळातील पुरवठादारांची देयके अद्यापही रखडलेलीच! दिवाळीपूर्वी पैसे न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

agitation
agitationesakal

साक्री : कोरोनासारख्या आपत्ती काळात तालुका आरोग्य विभागांतर्गत सुरू करण्यात आलेल्या भाडणे व पिंपळनेर येथील कोविड केअर सेंटरला गरजेच्या वेळी अत्यावश्यक साहित्य पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांचे तब्बल दहा लाख ४२ हजार ७७१ रुपये दोन वर्षांपासून अद्यापही मिळालेले नाहीत.

आपत्ती काळात प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुरवठा करणाऱ्या या सर्व पुरवठादारांना हे पैसे अद्याप मिळत नसल्याने त्यांच्यासमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या असून, दिवाळीपूर्वी हे पैसे न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. (Payments of suppliers in Covid era still stuck Warning of agitation money not received before Diwali Nandurbar News)

कोविडचा संसर्ग वाढल्याने उपलब्ध आरोग्यव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात ताण पडला होता. अशा वेळी प्रशासनातर्फे तात्पुरत्या स्वरूपात कोविड केअर सेंटर उभारत त्या ठिकाणी रुग्णांवर उपचार करण्यात येत होते.

यात साक्री तालुक्यात भाडणे व पिंपळनेर येथे दोन कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल रुग्णांना औषधोपचारासोबतच जेवणदेखील पुरविण्यात येत होते.

कोरोनाकाळात संसर्गाची प्रचंड भीती निर्माण झाल्याने अनेक व्यावसायिक या कोविड केअर सेंटरला साहित्याचा पुरवठा करण्यास नकार देत असताना काही पुरवठादारांनी मात्र प्रशासनाला सहकार्य करत सर्व प्रकारचे साहित्य, औषधे, भोजन इत्यादी पुरविले.

त्या वेळी साहित्याची उपलब्धता करण्यासाठी पुरवठादारांनी प्रसंगी कर्ज काढले; परंतु आपत्ती काळात साहित्याचा तुडवडा निर्माण होऊ दिला नाही. मात्र या सर्व पुरवठादारांना दोन वर्षांपासून त्यांचे पैसे मिळालेले नाहीत.

थकीत पैशांसाठी शासकीय कार्यालयांना वारंवार चकरा मारूनदेखील त्यांचे पैसे अद्यापपर्यंत मिळालेले नाहीत. तसेच प्रशासनकडूनदेखील त्यांना कुठलेही ठोस आश्वासन देण्यात येत नसल्याने हे सर्व पुरवठादार मात्र मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडले आहेत.

agitation
Nashik News: बाह्यवळण रस्ता अडकला लालफितीत! 100 कोटी रुपये मंजूर तांत्रिक अडचणीमुळे रखडले काम

अशी आहे थकबाकी

या थकबाकीदारांमध्ये भाडणे कोविड सेंटर येथे भोजनपुरवठा करणाऱ्या ओम साई केटर्सचे चार लाख ९३ हजार २६०, औषध पुरवठा करणाऱ्या भास्कर मेडिकलचे दोन लाख सात हजार ७११, ग्लोव्हज, सोडियम हायड्रोक्लोराइड, हँडवॉश, बेडशीट पुरवठा करणाऱ्या श्री बालाजी एजन्सी साक्रीचे २१ हजार ९२५,

पिंपळनेर येथे भोजन व पाणीपुरवठा करणाऱ्या हिंदुस्तान स्पोर्टस ॲन्ड कराटे असोसिएशनचे एक लाख ४२ हजार २४०, सादील साहित्य पुरवणाऱ्या साक्री येथील ओम शांती स्टोअर्सचे आठ हजार ४००, पिंपळनेर येथील वरद प्रिंटर्स ॲन्ड झेरॉक्स स्टेशनरीचे दोन हजार ६५५, साई नॉव्हेल्टीचे २८ हजार ३६३,

एलईडी बल्ब पुरविणाऱ्या पिंपळनेर येथील फौजी इलेक्ट्रिकचे दहा हजार ६६०, गॅस सिलिंडर पुरवणाऱ्या हर्शल सोनवणे यांचे सात हजार ५००, एचव्हीआय किट पुरविणाऱ्या ए.एस. डिस्ट्रिब्युटर्स धुळेचे ३२ हजार, पिंपळनेर येथे इलेक्ट्रिक साहित्य, वस्तू, फॅन बसविणाऱ्या बालाजी सेल्स ॲन्ड सर्व्हिसेसचे १६ हजार ३३०,

साक्री येथे औषधपुरवठा करणाऱ्या चेतन मेडिकलचे दोन हजार २५०, मेडिकल वेस्ट उचलणाऱ्या श्री स्वामी समर्थ इंटरप्राइजेस बायोमेडिकल्स धुळेचे ५९ हजार ८०५, बेडशीट पुरविणाऱ्या मोना कलेक्शनचे सहाशे रुपये, तर पिंपळनेर येथे औषध पुरविणाऱ्या मेडिकल फार्मसीसचे नऊ हजार ७२ असे एकूण दहा लाख ४२ हजार ७७१ रुपये या सर्व पुरवठादारांना अद्याप मिळालेले नाहीत.

"कोरोनासारख्या आपत्तीच्या काळात संसर्गाची भीती असताना, जवळ पुरेसे पैसे नसताना कर्ज काढून रुग्णांना वेळेवर जेवण पुरविले. मात्र गेले दोन वर्षे बिलाचे पैसे मिळालेले नाहीत. अनेक वेळा शासकीय कार्यालयांमध्ये पैसे मागण्यासाठी गेलो, मात्र आम्हाला समाधानकारक उत्तर मिळत नाही. हे पैसे लवकरात लवकर मिळावेत अन्यथा आमच्यावर उपासमारीची वेळ येईल."

-सुरेश आचारी, ओम साई केटर्स, साक्री

agitation
Nashik: माजी आमदारांची मोट विस्कळित! संजय पवारांनी सोडली भुजबळांची साथ; नांदगावची राजकीय समीकरणे बदलणार?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com