Dhule News : अज्ञात मृतदेहाची ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन

Death Body News
Death Body Newsesakal

Dhule News : साळवे (ता. शिंदखेडा) गावशिवरातील शेत गट क्रमांक ४२/२ शेतातील विहिरीत अनोळखी पुरुषाचा मृतदेह गुरुवारी (ता. २) पाण्यावर तरंगताना आढळला.

ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढून शिंदखेडा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. विनय पवार यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. (Police appeal to identify unidentified body Dhule News)

वय अंदाजे ४५ ते ५० वर्षे, बांधा मजबूत, अंगात आकाशी रंगाचा फुलबाह्यांचा शर्ट व फिक्कट तपकिरी रंगाची पॅन्ट, उजव्या हातावर मनगटाच्या मागे गोंधलेले आहे.

ओळख पटविण्याचे आवाहन शिंदखेडा पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक प्रशांत पवार यांनी केले असून, ०२५६६-२२२२३३ या दूरध्वनी क्रमांकावर व पोलिस नाईक प्रशांत पवार यांच्या (मो. ९३७१०२१३१०) संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Death Body News
Nashik Accident News : कसारा घाटात 4 वाहनांचा विचित्र अपघात ; 2 जण ठार,1 जखमी; शेकडो कोंबड्या मृत्युमुखी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com