
नाशिक : विजया पवार यांची कहाणी काही औरच. १२ वर्षांपूर्वी लग्न झालेले. आश्रमशाळेत परिचर असलेले पती. विजया या मूळचा नाशिकच्या पंचवटीतील अमृतधाम परिसरातील. त्यांचे सासर शहाद्याचे;पती नाशिकजवळच असलेल्या आश्रमशाळेत असल्याने त्या नाशिकमध्येच. त्यांना 11 वर्षांचा मुलगा नैतिक अन् चार वर्षांची मुलगी अनन्या आहे.
आरक्षणामुळे अडचण
कला शाखेची पदवी घेतल्यानंतरही गृहिणी म्हणूनच जबाबदारी पार पाडत असताना, दोन वर्षांपूर्वी त्यांनी पहिल्यांदा राज्यसेवेची परीक्षा दिली. त्या परीक्षा उत्तीर्णही झाल्या; परंतु आरक्षणासंदर्भातील अडचणीत प्रकरण न्यायालयात गेले. त्यामुळे परीक्षा उत्तीर्ण होऊनही त्यांना पोलिस उपनिरीक्षकाच्या प्रशिक्षणाला जाता आले नाही. त्यामुळे पुन्हा जिद्दीने अभ्यास सुरू केला आणि परीक्षा उत्तीर्ण झाल्या. विजया या जेव्हा पोलिस अकादमीत प्रशिक्षणासाठी आल्या. त्यावेळी त्यांचे वजन होते 78 किलो.,
आईचे उपकार... तिन्ही मुलांचे शिक्षण पूर्ण
त्यानंतर जे परिश्रम घेतले त्यामुळे काही महिन्यांत त्यांचे वजन तब्बल 22 किलोने कमी झाले. त्यांच्या आईने काबाडकष्ट करून मुलांचे शिक्षण पूर्ण केले. नव्हे, तर सुशिक्षितही केले. यात एकीला शिक्षिका, तर दोघी बहिणी एकाच वेळी पोलिस उपनिरीक्षकाच्या परीक्षा उत्तीर्ण झाल्या आणि प्रशिक्षणही सोबतच केले. वडिलांचे बालपणीच जाणे आणि एकुलत्या भावाचेही काही वर्षांपूर्वी अपघाती निधन. आयुष्यातील आव्हाने पेलताना समाजाला न्याय देण्यासाठीच प्रयत्नशील राहू, अशीच प्रतिज्ञा महिला प्रशिक्षणार्थींत सर्वोत्कृष्ट ठरलेल्या विजया पवार यांनी केली.
हेही वाचा > अगदी दुष्काळी छावण्यांत राहण्याचीही 'त्याच्या'वर वेळ आली....तरीही...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.