Dhule Political News : धुळे लोकसभा; काँग्रेस- राष्ट्रवादीच्या निर्णयावर लढतीचे भवितव्य

Ajit Pawar Latest News
Ajit Pawar Latest News esakal

Dhule Political News :

लोकसभेचा धुळे मतदारसंघ हा काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या पारंपरिक जागा वाटपात काँग्रेसला सुटला आहे, तर पूर्वीच्या भाजप- शिवसेना युतीत भाजपच्या वाटेला आला आहे. सद्यःस्थितीत राज्यातील सत्तेची गणिते बदलल्याने याही मतदारसंघात भाजपने जवळीक केलेल्या शिंदे- पवारांकडून भाजपला या मतदारसंघातील जागा विनासायास देऊ होते की त्यांना शरद पवार यांच्यातर्फे नव्या दमाचा उमेदवार देऊन आव्हान दिले जाते, हा औत्सुक्याचा भाग असेल.

- निखिल सूर्यवंशी, धुळे

(Political News Dhule Lok Sabha fate of fight depends on decision of Congress NCP)

लोकसभेच्या धुळे मतदारसंघात धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिंदखेडा आणि नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्य, मालेगाव ग्रामीण, शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. भाजपचे प्रताप सोनवणे वगळता या मतदारसंघात धुळे जिल्ह्यातीलच उमेदवारांचे प्राबल्य राहिले आहे.

यातही हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र, गेल्या दीड दशकात तो भाजपने पद्धतशीरपणे पोखरला. मोदी लाटेत या मतदारसंघात भाजपने पाळेमुळे रोवली. स्वाभाविकपणे या मतदारसंघातील आगामी निवडणुकीतही उमेदवारीबाबत भाजपचाच वरचष्मा असेल.

पक्षावर हक्क कुणाचा?

पूर्वी भाजप- शिवसेना युती होती. त्यावेळी भाजपच्या वाटेला हा मतदारसंघ आला. भाजप- शिवसेनेत काडीमोड झाल्यानंतर शिवसेनेचा ठाकरे गट सध्या महाविकास आघाडीत समाविष्ट झाला आहे. दुसरीकडे शिवसेनेतील फुटलेला शिंदे गट हा भाजप सोबत आहे.

यात भरीस भर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही उभी फूट पडली असून अजित पवार यांनी पक्षावर दावा ठोकत शिंदे- फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आणि सत्तेत सहभाग घेतला आहे.

तत्पूर्वी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा वाटपात हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाटेला आला आहे. आता राष्ट्रवादीत फूट पडल्याने आणि या पक्षावर नेमका शरद पवार की अजित पवार यापैकी कुणाचा हक्क सिद्ध होतो, त्यावरही या मतदारसंघातील लढतीचे भवितव्य अवलंबून असेल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Ajit Pawar Latest News
Ajit Pawar Latest News : शरद पवारांवर गुगली? काल पाठिंबा देणारा आमदार आज देवगिरी बंगल्यावर अजित पवारांच्या भेटीला

जागेची अशी स्थिती

असे असताना काँग्रेसने या मतदारसंघातील इच्छुकांची चाचपणी सुरू केली आहे. त्यात काँग्रेसने हा मतदारसंघ लढवावा, अशी मागणी इच्छुकांसह नेत्यांनी केली आहे. सद्यःस्थितीत भाजपचे डॉ. सुभाष भामरे हे या मतदारसंघात दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत.

निवडणुकीवेळी त्यांचे प्रतिस्पर्धी धुळे ग्रामीणचे काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील दुसऱ्या स्थानावर होते. ते आता लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक नाहीत. शिंदे- पवार गटाने भाजपला पाठिंबा दिला तर भाजपचाच उमेदवार रिंगणात असेल.

त्यास शिवसेनेचा ठाकरे गट, काँग्रेस, एमआयएमचे आव्हान असेल. यातही ठाकरे गट, शरद पवार यांना उमेदवार देण्याची आतापर्यंत गरज पडली नव्हती.

परंतु, सत्तेतील राजकीय गणिते उलटसुलट झाल्याने आणि काँग्रेसचे उमेदवार या मतदारसंघात सतत पराभूत होत असल्याने राष्ट्रवादीला उमेदवारीची संधी दिली जावी, अशीही मागणी स्थानिकांकडून होत आहे. त्यामुळे तशी वेळ आलीच तर नेते शरद पवार यांना उमेदवाराचा शोध घ्यावा लागेल.

धुळे जिल्ह्यातून इच्छुक उमेदवार

धुळे जिल्ह्यातून तूर्त खासदारकीसाठी डॉ. सुभाष भामरे, आमदार अमरिशभाई पटेल, जिल्हा परिषद सदस्य धरती देवरे, तर काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष श्‍यामकांत सनेर यांचा इच्छुकांच्या यादीत

समावेश आहे. प्रत्यक्षात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या निर्णयावर या धुळे लोकसभा मतदारसंघातील लढतीचे भ

Ajit Pawar Latest News
Ajit Pawar Latest Update : राष्ट्रवादीतील महाभारत नेत्यांसह कार्यकर्तेही 'वेट अ‍ॅण्ड वॉच'च्या भूमिकेत; ठाकरेंच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com