ग्रामपंचायत निवडणुकांची आजपासून रणधुमाळी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

नाशिक जिल्ह्यात सार्वत्रिक ग्रामपंचायतीसाठी येत्या 8 डिसेंबरला मतदान होणार आहे. निवडणुकीत 48 ग्रामपंचायतींत 597 इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले. नांदगाव तालुक्‍यातील सात ग्रामपंचायतींसाठी 135 अर्ज आले आहेत. तर निफाड तालुक्‍यातील दहा ग्रामपंचायतींसाठी 124, बागलाण 19 ग्रामपंचायतीसाठी 67, मालेगाव तालुक्‍यातील तीन ग्रामपंचायतींत 53, कळवणमध्ये चार ठिकाणी 53, देवळ्यात एक ठिकाणी 34, येवल्यात दोन ठिकाणी 14, तर नाशिकमधील एक ग्रामपंचायतीसाठी आठ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

नाशिक : जिल्ह्यातील नऊ तालुक्‍यांतील 48 ग्रामपंचायतींसाठी 597 उमेदवार निवडणूक रिंगणात असून सोमवारी (ता.25) दुपारी तीनपर्यंत माघारीची मुदत असून, सायंकाळपासून चित्र स्पष्ट झाल्यानंतर खऱ्या अर्थाने जिल्हाभर प्रचाराची रणधुमाळी उडणार आहे. 

48 ग्रामपंचायतींसाठी 597 उमेदवार रिंगणात 

जिल्ह्यात सार्वत्रिक ग्रामपंचायतीसाठी येत्या 8 डिसेंबरला मतदान होणार आहे. निवडणुकीत 48 ग्रामपंचायतींत 597 इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले. नांदगाव तालुक्‍यातील सात ग्रामपंचायतींसाठी 135 अर्ज आले आहेत. तर निफाड तालुक्‍यातील दहा ग्रामपंचायतींसाठी 124, बागलाण 19 ग्रामपंचायतीसाठी 67, मालेगाव तालुक्‍यातील तीन ग्रामपंचायतींत 53, कळवणमध्ये चार ठिकाणी 53, देवळ्यात एक ठिकाणी 34, येवल्यात दोन ठिकाणी 14, तर नाशिकमधील एक ग्रामपंचायतीसाठी आठ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. सोमवारी दुपारी तीनपर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे. त्यामुळे सोमवारी दुपारपर्यंत ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असून, लागलीच निवडणूक रिंगणातील अंतिम उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप होणार असल्याने उद्या सायंकाळपासून प्रचाराला सुरवात होणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने प्रचारात रणधुमाळी उडणार आहे. येत्या 8 डिसेंबरला सकाळी साडेसातला सायंकाळी साडेपाचपर्यंत मतदान प्रक्रिया घेतली जाईल. तर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 9 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. 

हेही वाचा > 'हे' आमदार अद्यापही कुटुंबीयांसाठी "नॉट रिचेबल' 

दिंडोरीत मोठा उत्साह 
थेट जनतेतून सरपंच निवड होणार असल्याने सरपंचपदासाठी मोठी चुरस आहे. दिंडोरी तालुक्‍यात सर्वाधिक उत्साह आहे. दिंडोरीतील एका ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी तब्बल 31 इच्छुकांनी अर्ज भरले आहेत. याशिवाय देवळा (7), कळवण (27), येवला (10), नांदगाव (25), मालेगाव (14), निफाड व बागलाण प्रत्येकी (24), नाशिक (3) उमेदवार सरपंचपदासाठी रिंगणात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Preparation of Gram Panchayat elections from today Nashik political Marathi News