इगतपुरी तालुक्यात खरीपाच्या तयारीला वेग

विजय पगारे
शुक्रवार, 8 जून 2018

इगतपुरी : इगतपुरी शहरासह तालुक्यात हंगामातील पावसाचे आगमन झाल्याने बळीराजा सुखावला आहे. पावसाचे योग्य वेळेवर आगमन झाल्यामुळे खरीपाच्या तयारीला वेग आला असुन शेतकऱ्यांसह तालुक्याचा कृषी विभागही सज्य झाला आहे. भात लागवडीत अग्रेसर असणाऱ्या इगतपुरी तालुक्यात यंदा 32 हजार 237 हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले असुन चालु हंगामात तालुक्यात 27 हजार 200 हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात येणार आहे. सध्या झालेल्या पावसामुळे हिरवीगार भाताची रोपं डोळ्यांचे पारणे फेडत आहेत. 

इगतपुरी : इगतपुरी शहरासह तालुक्यात हंगामातील पावसाचे आगमन झाल्याने बळीराजा सुखावला आहे. पावसाचे योग्य वेळेवर आगमन झाल्यामुळे खरीपाच्या तयारीला वेग आला असुन शेतकऱ्यांसह तालुक्याचा कृषी विभागही सज्य झाला आहे. भात लागवडीत अग्रेसर असणाऱ्या इगतपुरी तालुक्यात यंदा 32 हजार 237 हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले असुन चालु हंगामात तालुक्यात 27 हजार 200 हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात येणार आहे. सध्या झालेल्या पावसामुळे हिरवीगार भाताची रोपं डोळ्यांचे पारणे फेडत आहेत. 

तालुक्यात 126 महसूली गावे व वाड्यामधील शेतकरी भात, वरई, नागली सोयाबीन, खुरसणी, मका व इतर पिके घेतात खरीप हंगामात इंद्रायणी,फुले समृद्धी ,एक हजार आठ,सोनम,गरी, हाळी,कोळपी या जातीचे भात पिके घेण्यास प्राधान्य देतात तालुक्याचे खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र 23 हजार 332 हेक्टर असुन यंदाच्या खरीप पेरणीचे उद्दिष्ट्य 32 हजार 237 हेक्टर असल्याची माहीती तालुका कृषी अधिकारी संजय शेवाळे यांनी दिली मागील वर्षी 31 हजार 431हेक्टरचे उदिष्टय होते गेल्या हंगामात एकत्रित 3 हजार 876 मिलीमीटर पावसाची नोंद घेण्यात आली होती. 

इगतपुरी तालुका हा भातपिकासाठी प्रसिद्ध तालुका म्हणून ओळखला जातो पोषक असे वातावरण असलेल्या व पाऊसाचे माहेर घर समजल्या जाणाऱ्या या तालुक्यात भात शेतीला मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते.यामध्ये प्रामुख्याने इंद्रायणी,गरी कोळपी,1008, वाय.एस.आर,हळे,पूनम,डी १००,ओम 3,सेंच्युरी,ओम श्रीराम 125,रुपाली, रुपम, विजय, आवणी, लक्षमी, खुशबू, सोनम, दप्तरी 1008, वर्षा, राजेंद्र, बासमती आदी प्रमुख भात जाती या तालुक्यात घेतल्या जातात.दरम्यान भाताचे कोठार समजल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यात भात शेती मोठ्या प्रमाणात होते मात्र भात शेतीचा वाढता खर्च बघितला तर ते देखील करणे मुश्किल होत आज खतांच्या वाढणाऱ्या किमती,बी बियाणे,औषधे हे वापरून शेतकरी मेटाकुटीस आला असून खतांच्या किंमतीत दरवर्षी दहा टक्यानी वाढ होत आहे तर भाताला दरवर्षी भाव आहे तोच राहतो. 

दरम्यान गेल्या वर्षी तालुक्यात समाधानकारक पावसामुळेभात पिकाचे मोठया प्रमाणात उत्पादन झाले होते यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी तालुका कृषी विभागाकडून तालुक्यातील विविध गावांमध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाच्या माध्यमातुन पीक प्रात्याक्षिकांचे आयोजन करण्यात येणार आहे तसेच मृद आरोग्य अबाधित राखण्यासाठी 3 हजार 648 हेक्टर क्षेत्रात जमीनीची तपासणी करण्यात आली असुन 85 गावांमधील मातीचे नमूने घेण्यात आले आहेत त्याचबरोबर प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषी विभागाने केले आहे 

असे आहे खरीपाचे नियोजन  
पीक कंसात लागवडीचे उद्दिष्ट्य क्षेत्र हेक्टरमध्ये : भात -27 हजार 200 , नागली- 917,मका 309,कडधान्ये - 165 भईमुग 668,सोयाबीन - 711 खुरासनी -  321

तालुक्यात भात हे प्रमुख पीक आहे उत्पादन चांगल्या प्रमाणात व्हावे या उद्देशाने सुचनांचा अवलंब करण्यात यावा ग्लोरीसीडीयाचा वापर,ओळींद लागवड करण्यासाठी 15 बाय 25 सेटींमीटर युरीया ब्रिकेटचा अवश्य वापर करुन पारंपारीक चतुःसुत्रीचा वापर करण्यात यावा.
- संजय शेवाळे, तालुका कृषी आधिकारी,इगतपूरी

Web Title: preparations for kharip sowing in igatpuri tehsil