Dhule News : नोंदणीकृत मदरशाच्या अनुदानासाठी प्रस्ताव द्यावा

Anudan News
Anudan Newsesakal

Dhule News : राज्यातील नोंदणीकृत मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी डॉ. झाकिर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत अल्पसंख्याक विकास विभाग कार्यान्वित करण्यात आला आहे. यात अनुदानासाठी ३० जूनपर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

मानधनासाठी या योजनेंतर्गत मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी पायाभूत सुविधा, ग्रंथालयांसाठी अनुदान देणे, शिक्षकांच्या अनुदान व मदरशांमधील शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे आदी प्रयोजनांसाठी पात्र असलेल्या इच्छुक नोंदणीकृत मदरशांना अनुदान उपलब्ध करून दिले जाते.(proposal should be made for grant of a registered Madrasa Dhule News)

याअनुषंगाने पात्र मदरशांची शासनास अनुदानासाठी शिफारस करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

मदरशांकडून प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांची जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत विहित केलेल्या निकषांनुसार तपासणी करून पात्र मदरशांची शिफारस शासनास करण्यात येईल.

या अनुषंगाने या योजनेंतर्गत २०२३-२०२४ या वर्षासाठी अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या मदरशांनी परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे यांच्याकडे ३० जूनपर्यंत सादर करावेत. यानंतर प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत. प्रस्ताव सादर करण्याची कार्यपद्धती ११ ऑक्टोबर २०१३ च्या शासन निर्णयात नमूद केली असल्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी कळविले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Anudan News
Nashik News : शहरात Triple Seat स्वार सुसाट; वाहतूक शाखेचा अघोषित परवाना?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com