सरदार सरोवर प्रकल्पबाधित शेतकऱ्याला पावसाळ्यापूर्वी दिलासा

सरदार सरोवर प्रकल्पबाधित शेतकऱ्याने जमीन ताब्यात द्यावी, अन्यथा जमीन कब्जा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला होता.
सरदार सरोवर प्रकल्पबाधित शेतकऱ्याला पावसाळ्यापूर्वी दिलासा
SYSTEM
Updated on

तळोदा : सरदार सरोवर प्रकल्पबाधित शेतकऱ्याने खेडले (ता. तळोदा) शिवारात दिलेली ०.९२ आर जमीन ताब्यात द्यावी, अन्यथा जमीन कब्जा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला होता. त्यावर तातडीने कार्यवाही करत तळोदा तहसील कार्यालयाने खेडले शिवारातील जमीन प्रकल्पबाधित शेतकऱ्याला ताब्यात दिली आहे. त्यामुळे प्रकल्पबाधित शेतकऱ्याला पावसाळ्यापूर्वी दिलासा मिळाला आहे.

सरदार सरोवर प्रकल्पबाधित खाल्या दमण्‍या वसावे (रा. सिंदुरी, ता. अक्कलकुवा) यांना खेडले येथे सर्वे क्रमांक ३५/२ मधील ०.९२ आर शेतजमीन दिली होती. मात्र, शेतजमिनीवर दुसऱ्याचे अतिक्रमण असल्याचे निवेदन ३१ मेस तळोदा तहसीलदारांना दिले होते. त्या निवेदनात २ जूनपर्यंत जमीन ताब्यात न मिळाल्यास ३ जूनला जमीन कब्जा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला होता.

सरदार सरोवर प्रकल्पबाधित शेतकऱ्याला पावसाळ्यापूर्वी दिलासा
पत्रकार, महिलांना अश्‍लील व्हिडिओ कॉलचा तिसरा गुन्हा उजेडात

दरम्यान, दुसरीकडे महसूल विभागाने खाल्या वसावे यांना २८ ऑगस्ट २०१६ ला शेतजमीन ताब्यात दिली होती व जमिनीवर अतिक्रमण होणार नाही, याची काळजी घेण्याचे सूचित करून जबाब नोंदविला होता. मात्र, निवेदनाद्वारे माहिती कळल्याने तहसीलदार गिरीश वखारे, पोलिस निरीक्षक केलसिंग पावरा, उपनिरीक्षक अमितकुमार बागूल, नायब तहसीलदार शैलेंद्र गवते, भूकरमापक रोहित मालपुरे, मंडलाधिकारी मराठे, तलाठी योगेश गावित यांनी शेतात जाऊन अतिक्रमण करणाऱ्यांना समज दिली व पंचांसमक्ष खाल्या वसावे यांना जमिनीचा ताबा मिळवून दिला. खाल्या वसावे यांच्यातर्फे त्यांचा मुलगा मादाऱ्या खाल्या वसावे यांना ताबा देण्यात आला. महसूल विभागाने केलेल्या तत्पर कार्यवाहीमुळे प्रकल्पबाधितांनी आभार मानले. वाद टाळण्यासाठी जमिनीची मोजणी करून देय असलेल्या जमिनीचे सीमांकन करून मिळावे, अशी अपेक्षा प्रकल्पबाधितांनी व्यक्त केली आहे. काल्या पाडवी, लालसिंग पाडवी, चंद्रसिंग तडवी, सोदया वसावे, पारता तडवी, राज्या वसावे व इतर प्रकल्पबाधित या वेळी उपस्थित होते.

सरदार सरोवर प्रकल्पबाधित शेतकऱ्याला पावसाळ्यापूर्वी दिलासा
ZP च्‍या शाखा अभियंत्‍यास दीड लाखांची लाच स्‍वीकारतांना अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com