Dhule News : डीपी रोडवर अतिक्रमण निर्मूलन सुरू; मनपातर्फे 96 घरे हटविणार

Chalisgaon Road Area D. P. JCB while removing residential encroachments on the road on Tuesday.
Chalisgaon Road Area D. P. JCB while removing residential encroachments on the road on Tuesday. esakal

Dhule News : शहरातील चाळीसगाव रोड परिसरात नॅशनल ऊर्दू हायस्कूलजवळ डीपी रस्ता आहे. यावर ९६ घरांचे अतिक्रमण झाले. ते हटविण्यास महापालिका प्रशासनाने मंगळवारी (ता. २) सुरवात केली. (Removal of encroachments 96 houses will be removed by municipality on DP Road started dhule news)

यात सायंकाळपर्यंत सरासरी ५० ते ६० अतिक्रमणे हटविण्यात आली. या वेळी फारसा विरोध न झाल्याने शांततेत कारवाई झाली. या अतिक्रमण निर्मूलनामुळे डीपी रोड मोकळा श्‍वास घेणार आहे.

पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण निर्मूलन केले जात आहे. वादग्रस्त डीपी रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला होता. या ठिकाणी सरासरी ४० ते ५० वर्षांत ९६ निवासी अतिक्रमणे झाली. या प्रकरणी महापालिकेने न्यायालयात धाव घेतली होती.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने २०१९ मध्ये महापालिकेच्या बाजूने निकाल दिला. नंतर कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अतिक्रमण निर्मूलनास स्थगिती देण्यात आली. ती उठल्यानंतर पवित्र रजमान सणामुळे कारवाई स्थगित ठेवण्यात आली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Chalisgaon Road Area D. P. JCB while removing residential encroachments on the road on Tuesday.
Akkalpada Water Supply Scheme : धुळेकरांना लवकरच दिवसाआड पाणी

सण सरल्यावर महापालिकेने संबंधित अतिक्रमणधारकांना नोटीस बजावली. यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने मंगळवारी पोलिस बंदोबस्तात डीपी रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यास सुरवात केली. तत्पूर्वी वीज कंपनीकडून परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला. अनेक जणांनी स्वतःहून अतिक्रमणे काढली.

अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रसाद जाधव, लक्ष्मण पाटील तसेच चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याचे निरीक्षक धीरज महाजन, आझादनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पावरा, उपनिरीक्षक पवार, वीज महावितरण कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, बुधवारी (ता. ३) ही कार्यवाही सुरू राहील.

Chalisgaon Road Area D. P. JCB while removing residential encroachments on the road on Tuesday.
ZP Staff Transfer : जिल्हा परिषद कर्मचारी बदल्यांबाबत संभ्रम; वेळापत्रक जाहीर न झाल्याने पेच

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com