Dhule Municipality News : महापालिकेचे मंजूर ठराव वाचा ‘वेबसाइटवर’

स्थायी समिती, महासभांचे ठराव लगोलग महापालिकेच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात येत आहेत.
Website
Websiteesakal

Dhule Municipality News : महापालिकेचा कारभार सध्या प्रशासकांच्या माध्यमातून सुरू आहे. प्रशासकांच्या या कार्यकाळात स्थायी समिती, महासभांचे ठराव लगोलग महापालिकेच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात येत आहेत. प्रशासकांच्या कार्यकाळातील ही कार्यवाही निश्‍चितपणे स्वागतार्ह आहे.

ई-गव्हर्नन्सबाबतची ही गतिमानता पुढेही कायम राहील, अशी अपेक्षा आहे. दरम्यान, इतरही ऑनलाइन सेवा नागरिकांना सहज उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कार्यवाही गरजेची आहे. (Resolutions of Standing Committee General Assembly are being uploaded on website of dhule Municipal Corporation news)

महापालिकेतील सत्ताधारी भाजपचा पंचवार्षिक कालावधी डिसेंबर-२०२३ अखेर संपुष्टात आल्यानंतर महापालिकेत प्रशासकराज सुरू झाले आहे. त्यामुळे संपूर्ण कारभार आयुक्त तथा प्रशासक श्रीमती दगडे-पाटील यांच्या नेतृत्वात सुरू आहे.

प्रशासकांच्या कार्यकाळात विविध कामे मंजूर होत असली तरी ती त्यांच्या दालनात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्गी लागतील, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रशासक श्रीमती दगडे-पाटील यांनी स्थायी समितीची साप्ताहिक सभा व गरजेनुसार महासभा घेण्याची परंपरा कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.

अर्थात या सभांमध्ये कुणीही सदस्य नसतात, त्यामुळे तक्रारी, आरोप-प्रत्यारोपांचा काही प्रश्‍न येत नाही. मात्र, प्रशासनाच्या माध्यमातून शहरासाठी जे निर्णय होतील, जी कामे मंजूर होतील, त्याची माहिती नागरिकांना मिळत राहावी.

कोणती कामे, किती खर्चाची कामे मंजूर झाली, कोणत्या भागात कामे मंजूर झाली यासह बैठकांमधील कार्यवाही लोकांपर्यंत जावी या हेतूने स्थायी समिती सभा, महासभेची परंपरा कायम ठेवत असल्याचे प्रशासक श्रीमती दगडे-पाटील यांनी स्पष्ट केले, त्यानुसार गेल्या एक-दीड महिन्यात तीन स्थायी सभा व एक महासभा झाली.

Website
Dhule Municipality News : 1 मालमत्ता सील, 3 नळ बंद; मनपा पथकांची कारवाई

ठराव लगेच वेबसाइटवर

स्थायी सभा, महासभेत झालेले ठराव लोकांपर्यंत जावेत यासाठी सभा झाल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळपर्यंत किंवा फार तर दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी धुळे महापालिकेच्या वेबसाइटवर अपलोड करण्याच्या सूचना श्रीमती दगडे-पाटील यांनी नगरसचिव विभागाला दिले.

या निर्देशानुसार नगरसचिव मनोज वाघ यांच्यासह नगरसचिव कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारी मंजूर ठराव शक्य तेवढ्या लवकर वेबसाइटवर अपलोड करण्यासाठी कार्यवाही करत असल्याचे दिसते. कारण गेल्या दीड महिन्यातील तीन स्थायी सभा व महासभेचे सर्व ठराव धुळे महापालिकेच्या http://www.dhulecorporation.org/EIPPROD/downloads.jsp या वेबसाइटवर अपलोड करण्यात आले आहेत.

गतीमानता स्वागतार्ह

सभांचे ठराव वेबसाइटवर लगेच अपलोड होत असल्याने लोकांना ते जाणून घेणे अधिक सोयीस्कर होत आहे. अर्थात याबाबत अधिक जागरूकतेची गरज आहे. कारण महापालिकेच्या माध्यमातून सभांचे ठराव महापालिकेच्या वेबसाइटवर लगेचच पाहायला मिळू शकतात, याची माहिती बहुसंख्य नागरिकांना नाही. तशी सवयदेखील नसल्याने सर्वसामान्य नागरिक ते पाहण्याची तसदी घेत नाही. माहिती झाल्यानंतर त्याचा उपयोग होईल, अशी अपेक्षा आहे.

सुधारणेची गरज

महापालिकेच्या वेबसाइटवर मंजूर ठराव तत्काळ टाकण्याची कार्यवाही होत असली तरी यात अधिक सुटसुटीतपणा येण्याची गरज आहे. सद्यःस्थितीत मागील काही पंचवार्षिक कार्यकाळातील ठरावही वेबसाइटवर अपलोड आहेत. मात्र, कोणते ठराव कोणत्या वर्षाचे, तारखेचे आहेत हे कळायला मार्ग नाही. त्यामुळे प्रत्येक ठराव ओपन करून बघावा लागतो. हे टाळण्यासाठी वर्गीकरणात्मक पद्धतीने ठराव अपलोड व्हावेत, अशी अपेक्षा आहे.

Website
Dhule News : सोनगीरला जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com