Nandurbar Crime: शहाद्यात 2 गटांतील वादाने दंगल; 10 जखमी, 1 गंभीर

Police patrolling to bring the riot under control.
The riots caused damage on Friday
Police patrolling to bring the riot under control. The riots caused damage on Fridayesakal

Nandurbar Crime: शहरात किरकोळ कारणावरून दोन गटांत शुक्रवारी (ता. २९) दुपारी अडीचच्या सुमारास वाद झाला. त्याचे पर्यवसन दंगलीत झाले. दंगलीत तुफान दगडफेक करण्यात आली.

त्यात अनेक घरांची तोडफोड करण्यात येऊन संसारोपयोगी साहित्याची नासधूस करण्यात आली. दंगल एवढ्यावरच न थांबता अनेक मोटारसायकली व चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. (Riot in Shahada due to dispute between 2 groups 10 injured 1 seriously Nandurbar Crime News)

या घटनेत आठ ते दहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली असून, एका जखमीस पुढील उपचारांसाठी नंदुरबार येथे हलविण्यात आले. दंगलीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी दंगल कुठल्या कारणामुळे झाली, याचा शोध पोलिस प्रशासनाकडून घेतला जात आहे.

दरम्यान, घटनास्थळी पोलिस अधीक्षक व अप्पर पोलिस अधीक्षक तळ ठोकून आहेत. सोबतच घटनास्थळासह लगतच्या परिसरात शीघ्र कृती दलाचे जवान, एसआरपी जवान व जिल्हा पोलिस दलाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला.

घटनेने अफवांचे पीक पसरून संपूर्ण शहरात अघोषित संचारबंदीसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. शहरातील कुकडेल परिसर, आझाद चौक, भाजी पीर व भवानी चौक या परिसरात दोन गटांत शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास मोठी दंगल उसळली.

तत्पूर्वी गणेशोत्सव शांततेत पार पडल्यानंतर शुक्रवारी सकाळी दहाला विविध भागांतील ईद-ए-मिलाद मिरवणुका निघाल्या होत्या. कुकडेल परिसरातील भाजी पीर येथूनही ईद-ए-मिलादची मिरवणूक शांततेत गेल्यावर अन्य एक मिरवणूक भवानी चौकातून जात असताना किरकोळ वाद झाला.

माहिती मिळताच पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी घटनास्थळी धाव घेत वाद शांत केला. तरीही त्या परिसरात धुसफूस सुरूच होती. दरम्यान ईद-ए-मिलादच्या सर्व मिरवणुका शांततेत पार पडल्यानंतर पुन्हा दुपारी अडीचच्या सुमारास त्या परिसरात पुन्हा दोन्ही गटांत वाद उफाळून आला.

Police patrolling to bring the riot under control.
The riots caused damage on Friday
Nashik Crime: बलात्काराच्या गुन्ह्यातील संशयिताचे पोलिसांच्या हाताला झटका देत पलायन

या वादाचे पर्यवसान तुफान दगडफेकीत झाले. त्यात आठ ते दहा जण जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली असून, एक गंभीर झाला. त्याला उपचारांसाठी नंदुरबार येथे हलविण्यात आले आहे.

अनेक मोटारसायकलींची आणि चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. त्यात पोलिस कर्मचारी व गृहरक्षक दलाच्या जवानांच्या मोटारसायकलींची तोडफोड झाली. घरातील संसारोपयोगी साहित्याचीही नासधूस करण्यात आली.

दोन्ही गटांतील समाजकंटकांच्या या कृत्यामुळे निम्मे शहर तणावाखाली गेले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पवार, निरीक्षक शिवाजी बुधवंत व त्यांच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील व अप्पर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे घटनास्थळी तळ ठोकून आहेत.

भाजीपीर, कुकडेल परिसर, आझाद चौक, भवानी चौक, आझाद चौकातून पिंगाणेकडे जाणारा पूल पाडळदा चौफुली आदी परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

घटना घडल्यावर अनेक व्यापाऱ्यांनी आपापला प्रतिष्ठाने बंद केली. दरम्यान, परिसरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले.

"शहादा शहरात दोन गटांत वाद झाला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिस बंदोबस्त लावला आहे. पोलिसांकडून पेट्रोलिंग सुरू आहे. संपूर्ण परिसरात शांतता आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवा पसरवू नयेत, तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये. नेमका वाद कसा झाला याचा शोध पोलिस घेत आहेत." - पी. आर. पाटील, पोलिस अधीक्षक,

"नंदुरबार शहरात घडलेली घटना अशोभनीय व निंदनीय आहे. दोन्ही समाजबांधवांनी शांतता राखून सलोखा कायम ठेवावा. कायदा व सुव्यवस्था कोणीही हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. पोलिसांनी समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी."

- राजेश पाडवी, आमदार

Police patrolling to bring the riot under control.
The riots caused damage on Friday
Chandgad Crime : ठेकेदाराकडून 'लाच' घेताना महिला उपअभियंता जाळ्यात; चंदगडात 'लाचलुचपत'ची धडक कारवाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com