Sakal Drawing Competition: विविधरंगी रंगछटा, कलाविष्कारांनी रंगली बालदुनियेची चित्रकला स्पर्धा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

students doing drawing at sakal drawing competition

Sakal Drawing Competition: विविधरंगी रंगछटा, कलाविष्कारांनी रंगली बालदुनियेची चित्रकला स्पर्धा!

नंदुरबार : उभ्या-आडव्या काळ्या रेषांचा संगम, सुप्तगुणांना चालना देत कल्पनाशक्तीचा वापर करीत कलाविष्काराने तयार केलेले चित्र, त्यात विविधरंगी रंगछटांनी मढवून कोणी निसर्गाचे रम्य चित्र, तर कोणी कोरोनाकाळातील लसीकरणाचे हुबेहूब चित्र रेखाटत एकाग्रतेने जीव ओतून आपलेच चित्र झकास करण्याची जणू काय शर्यतच आहे अशा भावनेने रंगविश्‍वात हरवलेल्या बालदुनियेचा नजारा रविवारी (ता. २२) जिल्हाभर शाळा-संस्थांमध्ये मुलांनी प्रत्यक्ष अनुभवला. त्याला निमित्त होते ते ‘सकाळ’च्या चित्रकला स्पर्धेचे. (Sakal drawing competition 2023 gets huge responce in district nandurbar news)

‘सकाळ’ने गेल्या १९८५ पासून सुरू केलेल्या चित्रकला स्पर्धेचा कोरोनाकाळातील दोन वर्षांचा खंडानंतर यंदाची चित्रकला स्पर्धेची तेवढाच उत्साह, उत्सुकता आणि साऱ्यांनाच अतुरता होती. कोरोनाकाळात खंड पडल्यानंतरही अनेक शिक्षण संस्था व विद्यार्थी-पालकांकडून स्पर्धा केव्हा आहे, अशी उत्सुकतेने विचारणा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह ओसंडून वाहताना दिसला.

कारण ज्या स्पर्धेची उत्सुकता होती ती सकाळ माध्यम समूहाची चित्रकला स्पर्धा राज्यभर एकाच वेळेस ही स्पर्धा आयोजित केली. त्यात नंदुरबार जिल्ह्यातून शहरीच नव्हे तर ग्रामीण भागातूनही प्रचंड प्रतिसाद लाभला. मुलांमध्ये एवढा उत्साह होता, की थंडीचा शेवटचा टप्पा असला तरी अंगाला हळूच स्पर्श करणारी गुलाबी थंडीचे जराही भान न ठेवता ते आज आपल्या रंगछटांच्या विश्‍वात हरवून गेले होते.

जिल्ह्यात रविवारी अनेक केंद्रांवर स्पर्धा झाली. चार गटांत झालेल्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदविला. हजारो विद्यार्थ्यांनी सर्वच गटांतून सहभागी होत उदंड प्रतिसाद दिला.

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

हेही वाचा: SPORTS News : ‘खेलो इंडिया गेम’ मध्ये संस्कृती करणार राज्याचे प्रतिनिधित्व

मिशनच्या प्रांगणात भरला कलाविश्‍वचा मेळा

नंदुरबार येथील एस. ए. मिशन संस्थेच्या प्रांगणात अत्यंत शिस्तीने गटनिहाय बसलेले शिस्तप्रिय विद्यार्थी, टाचणी पडेल त्याचाही आवाज येईल एवढी शांतता, आपापल्या गटाला मिळालेल्या विषयाचे चित्र रंगविण्यात मग्न झालेले विद्यार्थी आणि त्यांच्यावर लक्ष ठेवून असलेले संस्थेतील शिक्षक, शिक्षिका व कर्मचारीवृंद, विविधरंगी रंगछटांच्या आविष्काराला आकार देत अत्यंत हुबेहूब चित्र रंगविणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे जणू काय मिशन संस्थेच्या प्रांगणात कलाविश्‍वाचा मेळा भरल्याचे चित्र निर्माण झाले होते.

शेकडो विद्यार्थ्यांनी एकाच वेळेस या संस्थेच्या प्रांगणात चित्रकला स्पर्धेत सहभागी होत रेकॉर्ड ब्रेक केला आहे. त्यासाठी प्राचार्या नूतनवर्षा वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील प्राथमिक, माध्यमिक, इंग्लिश मीडियम, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. त्यात प्राचार्या नूतनवर्षा वळवी, उपमुख्याध्यापक विजय पवार, पर्यवेक्षक मीनल वळवी, पर्यवेक्षिका वंदना जांबीलसा, कलाशिक्षक प्रसाद दीक्षित, अरुण गर्गे, मनीष पाडवी, किरण पाटील, विशाल पाटील, गौतम सोनवणे, खुशाल शर्मा, स्वप्नील पाटील, रोहन पाडवी, चंद्रकांत निकम यांनी परिश्रम घेतले.

हेही वाचा: SAKAL Drawing Competition 2023 : सटाण्यात चिमुकल्यांनी उधळले कुंचल्यातून सप्तरंग!