SAKAL Ground Report : काकडमाळ ग्रामस्थ भोगताहेत सजा ए कालापाणी!; रस्त्यासह मूलभूत सोयीसुविधांची गरज

Villagers deprived of basic amenities.
Villagers deprived of basic amenities.esakal

शिरपूर (जि. धुळे) : आमचे गाव म्हणायला महाराष्ट्रात आणि ये- जा करतोय मध्य प्रदेशाच्या हद्दीतून...! बाजारहाट, व्यवहारांसह अगदी दळण दळण्यासाठीही मध्य प्रदेशात जावे लागते. पावसाळ्यात आमचा जगाशी संपर्क तुटतो. आम्ही बळजबरीने एकांतवास भोगतो. सर्वच महत्त्वाची कामे मध्य प्रदेशात जाऊन करणे भाग पडते. मग साधा धड रस्ताही न देणाऱ्या महाराष्ट्रात का राहावे? मध्य प्रदेशात जाणे काय वाईट आहे? काकडमाळ (ता. शिरपूर) येथील सुमारे ४५ पैकी बहुतांश कुटुंबांची ही भावना नागरिक म्हणून अस्वस्थ करणारी आहे. (SAKAL Ground Report Villagers of Kakadmal suffer Need for basic amenities including roads Dhule News)

Villagers deprived of basic amenities.
Jalgaon News : कापसाचा दर्जा घसरतोय, वजनातही होतेय घट; 80 टक्के कापूस घरात
SYSTEM

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागातील काकडमाळ ग्रामस्थांचा उद्वेग समजून घ्यायला दोन किलोमीटरवर नजर टाकली तरी पुरेसे होते. काकडमाळपासून अवघ्या दोन किलोमीटरवर असलेल्या मध्य प्रदेशाच्या हद्दीत राजमौली गावाचे शिवार हिरव्यागार बागायती शेतीने फुलले आहे. गावापर्यंत काळीभोर डांबरी सडक आहे. काकडमाळला पोहचताना दुचाकीही धापा टाकते. घरापुरती सहा तास वीज मिळते. तिथे शिवारात काय मिळणार...! म्हणून शेती पावसाच्या भरवशावर चालते.

सुख नशिबातच नाही

काकडमाळला जाण्यासाठी शिरपूरपासून ५० किमीवर मध्य प्रदेश हद्दीतील जामन्या गाव गाठायचे. तेथून सात किमीवर राजमौली गावाला मध्य प्रदेशाची हद्द संपते. तेथून केवळ दुचाकी जेमतेम जाऊ शकतील, अशा जागोजागी उखडलेल्या चढउताराच्या रस्त्याला सुरुवात होते. ती काकडमाळकडे जाण्याची वाट असते. गाव टेकडीवर आहे. चढाव दगड- मुरुमाचा आहे. दुचाकीची चाके वारंवार घसरतात. दुचाकी असेल तरच ये-जा करणे शक्य होते. पावसाळ्यात तेही सुख नशिबात नसते. गावाखालचे नाले वाहू लागतात. चार महिने घरात बसून राहण्याशिवाय पर्याय उरत नाही.

घरकुलांच्या अनेक योजनाअसूनही गावातील नेमकी स्थिती.
घरकुलांच्या अनेक योजनाअसूनही गावातील नेमकी स्थिती.esakal

तरीही तो एमबीबीएस...

प्रशासनाला या स्थितीची जाणीव असावी. जूनमध्येच तीन महिन्यांचे आगाऊ स्वस्त धान्य तेथील दुकानदाराला दिले जाते. पळासनेर गावातून दुकानदार ते धान्य उचलतो. धान्य मिळते पण दळण्यासाठी चक्की नाही. धान्य घेऊन पाण्यातून वाट काढत राजमौली गाव गाठावे लागते. वीजपुरवठा अनियमित आहेच, तो खंडीत झाला तरी वायरमन गावात येत नाही. गरजू पायपीट करीत बाटवापाडा येथे पोहचतात आणि दुरुस्ती करून घेतात.

काकडमाळ गाव दुर्बळ्या ग्रामपंचायतीला जोडले आहे. गावाचा एक प्रतिनिधी सदस्य म्हणून निवडून दिला जातो. गावात चौथीपर्यंत प्राथमिक शाळा आहे. दररोज प्रवासाचे दिव्य पार पाडून येण्यास शिक्षकही नाखूश असतात. शिक्षणासाठी मुलांना आश्रमशाळा गाठण्यावाचून पर्याय नसतो. तरीही अशा अडचणीतून शिक्षण घेत रोकसिंह पावरा हा काकडमाळचा युवक एमबीबीएस झाला आहे, तो सध्या मुंबईला आहे.

हेही वाचा : शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

Villagers deprived of basic amenities.
Jalgaon Milk Union Election : तालुकानिहाय मेळावे, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
गावातील दृश्‍य.
गावातील दृश्‍य.esakal

उपचार पंधरा किमीवर

शिरपूर तालुक्यातील शेमल्या येथून काकडमाळपर्यंत एक रस्ता काही वर्षापूर्वी तयार झाला. पण उद्घाटनानंतर देखभालीअभावी तो सध्या निकामी आहे. त्यामुळे नाइलाजाने मध्य प्रदेश मार्गे ये- जा करणे ग्रामस्थांना भाग पडते. गरोदर महिला, रुग्णांना उपचारासाठी रात्री- बेरात्री १५ किमीवरील वकवाड प्राथमिक आरोग्य केंद्र गाठण्यावाचून पर्याय नसतो. तिथे जाण्यासाठी धड रस्ता नाही. गावात कूपनलिका आहे, पण विजेअभावी ती निरुपयोगी ठरली आहे. रस्ता नसल्याने गावापर्यंत येण्यास शासकीय अधिकारीही नाखूश असतात. एकंदरीत आपल्याला वाळीत टाकल्याची भावना येथील रहिवाशांमध्ये पसरल्याचे प्रकर्षाने जाणवते. मग महाराष्ट्रात कशासाठी राहायचे हा तेथील युवकांचा प्रश्न अंतर्मुख करून जातो.

"रस्त्याअभावी आम्हाला जगापासून तुटल्यासारखे वाटते. महाराष्ट्रात जाण्यासाठी आणि येण्यासाठीही मध्य प्रदेश गाठावा लागतो. गावापर्यंत खासगी प्रवासी वाहतूकही नाही. दुचाकी नसेल तर पायपीट करावी लागते. गरोदर स्त्रिया, आजारी ग्रामस्थांचे खूप हाल होतात. पावसाळ्यात अत्यंत विदारक परिस्थिती असते. महाराष्ट्राच्या हद्दीतून एक दर्जेदार रस्ता तयार करून द्यावा म्हणजे बरेचसे प्रश्न सुटतील व युवकांमधील नाराजी दूर होऊ शकेल."
- बबिता पावरा, गृहिणी, काकडमाळ

"आमचे गाव दुर्गम भागात असल्याने अद्याप विकासापासून दूर आहे. कोरोना संक्रमण काळात आमची लेकरे आश्रमशाळांमधून घरी आली. गावात मोबाईलची रेंज नसल्याने टेकड्यांवर जिथे नेटवर्क मिळेल तिथे जाऊन अभ्यास करीत होते. शासन पूर्ण रस्ता तयार करून देत नसेल तर किमान मध्य प्रदेशाच्या रस्त्यापर्यंत जोडणारा दोन-तीन किमीचा रस्ता तरी करून द्या. अन्यथा आम्हाला मध्य प्रदेशात विलीन होण्याची परवानगी द्यावी."

- मांगीलाल पावरा, शेतकरी, काकडमाळ

Villagers deprived of basic amenities.
Jalgaon Milk Union Election : सासू-सासऱ्याच्या पॅनलविरुद्ध सुनेचा प्रचार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com