
माझी वसुंधरा अभियानांतर्गत पांझरा नदी पात्र स्वच्छ करण्यासाठी शहरातील स्वयंसेवी, सामाजिक संघटना, रोटरी क्लब, रोटरॅक्ट क्लब, एसआरपीएफ, पोलिस विभाग तसेच विद्यार्थ्यांच्या सहभागाचे आवाहन करण्यात आले.
धुळे : माझी वसुंधरा अभियानांतर्गत व स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे यांच्या पुढाकाराने सोमवारपासून (ता.१५) शहरातील पांझरा नदी पात्रात स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ झाला. सभापती बैसाणे यांच्यासह नगरसेवक, अधिकारी, सफाई कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग नोंदविला.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
माझी वसुंधरा अभियानांतर्गत पांझरा नदी पात्र स्वच्छ करण्यासाठी शहरातील स्वयंसेवी, सामाजिक संघटना, रोटरी क्लब, रोटरॅक्ट क्लब, एसआरपीएफ, पोलिस विभाग तसेच विद्यार्थ्यांच्या सहभागाचे आवाहन करण्यात आले. या मोहिमेचा सोमवारी सकाळी सातला प्रारंभ झाला. श्री गणपती मंदिर ते साईबाबा मंगल कार्यालयापर्यंत पुल ते सिद्धेश्वर हॉस्पिटलपर्यंतच्या नदीपात्रात स्वच्छता करण्यात आली. सभापती बैसाणे यांच्यासह नगरसेवक हर्षकुमार रेलन, नगरसेविका किरण कुलेवार, कशिश उदासी, तसेच भाजपचे मंडळ अध्यक्ष राकेश कुलवार, गुलशन उदासी, निलेश खेडकर, सहाय्यक आरोग्याधिकारी लक्ष्मण पाटील, चंद्रकांत जाधव, सर्व स्वच्छता निरीक्षक व सफाई कामगारांनी या मोहिमेत सहभाग नोंदविला.
या मोहिमेत विविध संस्था, संघटना, अधिकारी- कर्मचारी, विद्यार्थी आदींनी सहभागी व्हावे, असे आवाहन सभापती बैसाणे यांनी केले आहे.