Nandurbar News : सातपुड्याचे सोने दिल्लीच्या दारात...! आमचुराची कोट्यवधींची उलाढाल

Amchur for sale in the market.
Amchur for sale in the market. esakal

"औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या आमचुराचे उत्पादन सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यांतच अधिक होते. आमचूर हे सातपुड्यातील प्रमुख उत्पादन असून, ते येथील शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला बळकटी देणारे आहे, त्यामुळे या परिसराचे ते सोनेच ठरते.

यासाठी धडगाव व मोलगी या दोनच बाजारपेठा असून, दोन्ही बाजारपेठांत रोज कोट्यवधींची उलाढाल होते. येथील आमचूर व्यापाऱ्यांच्या माध्यमातून दिल्ली व इंदूरसह गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश व पश्चिम बंगालमध्ये दाखल होत आहे."- प्रकाश पावरा, धडगाव (satpuda Amchur sale in delhi taloda Anniversary special article nandurbar news)

चवदार स्वयंपाकासाठी वापरले जाणारे विविध उत्पादने व अनेक प्रकारच्या औषधीनिर्मितीसाठी आवश्यक असलेल्या आमचुरासाठी सातपुड्याची चौथी रांग प्रसिद्ध आहे. येथे त्याचे मुबलक प्रमाणात उत्पादन घेतले जात असून, यंदाही सर्वत्र आमचुरासाठीच धावपळ दिसून येत आहे.

यासाठी मोलगी व धडगाव या दोनच बाजारपेठा उपलब्ध आहेत. दोन महिन्यांपासून ते दोन्ही बाजारपेठेत शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. पावसाळा जसा जवळ येतोय तशा दोन्ही बाजारपेठा फुलू लागल्या. रोज हजारो क्विंटल आमचूर दाखल होत असून, यातून कोट्यवधींची उलाढालही होत आहे.

सातपुड्यातील शेतकऱ्यांच्या वर्षभराचे आर्थिक नियोजन ठरविणारे हे उत्पादन असल्याने आमचुराच्या किमतींकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सद्यःस्थितीत आमचुराला प्रतवारीनुसार ८० ते २५० रुपये प्रतिकिलोपर्यंतचा भाव मिळत आहे.

यावर शेतकऱ्यांचे समाधान नसून ते चांगल्या किमतीच्या प्रतीक्षेत आहे. मोलगीतील सुगन लाहोटी, अशोक साखला, राजू साखला, कालू भन्साली, रवींद्र जैन, भिला राजू भोई व मोहन महाराज या व्यापाऱ्यांकडून सातपुड्यातील शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Amchur for sale in the market.
Nandurbar Fraud Crime : साखरपुड्यानंतर मुलीशी लग्न करण्यास नकार; 'वरा'वर फसवणुकीचा गुन्हा

"मागील वर्षी आमचुरला १५० पासून ३२० रुपये प्रतिकिलो भाव मिळला होता. यंदा यात पुन्हा वाढ होईल अशी अपेक्षा होती; परंतु किमती वाढण्याऐवजी २५ ते ३० टक्के कमी झाल्या. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. त्यातच अवकाळी पावसामुळे उत्पादन घटले. शिवाय प्रतही खालावली. परिणामी आमचे या वर्षाचे आर्थिक नियोजन प्रभावित झाले आहे." -बिलाड्या पाडवी, आमचूर उत्पादक, कुंडल (ता. धडगाव)

"मागील वर्षी भारतातील सर्व मार्केटपैकी धडगाव व मोलगीचा मार्केटमध्येच सर्वाधिक आमचूर दाखल झाले. अन्य मार्केटमध्ये अपेक्षेनुसार माल दाखल होत नव्हता. कंपन्यांकडून मागणी वाढल्याने धडगाव व मोलगी या दोन मार्केटमध्ये आमचुराला चांगला भाव मिळाला होता. यंदा सर्व मार्केटमध्ये चांगला माल येत असल्याने भाव कमी झाले आहेत." -राजू सांखला, आमचूर व्यापारी, मोलगी (ता. अक्कलकुवा)

दुसऱ्या क्रमांकावर सातपुड्याचे मार्केट

-जगदलपूर, रायपूर, संबलपूर (छत्तीसगड)

Amchur for sale in the market.
Nandurbar Storm Damage : तळोद्यातील नुकसानीचे पंचनामे पूर्ण; 160 हेक्टरवरील फळबागांचे नुकसान

-मोलगी, धडगाव (महाराष्ट्र)

-छिंदवाडा (मध्य प्रदेश)

-नडियाद (गुजरात)-कानपूर, लखनऊ (उत्तर प्रदेश.)

-अमृतसर (पंजाब)

-बांसवाडा (राजस्थान)

-निजामाबाद (आंध्र प्रदेश)

सातपुड्याच्या मालास प्रथम पसंती

आमचुरासाठी प्रसिद्ध मार्केटमध्ये जगदलपूर (छत्तीसगड) आघाडीवर असले, तरी दुसऱ्या क्रमांकावरील उद्योगजगतात मोलगी, धडगावच्या मालास अधिक मागणी असते. त्यानुसार येथील आमचूर दिल्ली, जयपूर, इंदूर, अहमदाबाद, मुंबई व छिंदवाडा येथे रवाना होतो.

Amchur for sale in the market.
Nandurbar Kharif Season : बियाणे खरेदी करताना काळजी घ्यावी; कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com