मुलगा दारूच्या आहारी...तरुण नात पदरात...पण खचेल त्या "मंगल आजी" कसल्या!

नीलेश छाजेड : सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 26 डिसेंबर 2019

मंगल माल्या या 70 ते 75 वर्षे ओलांडलेल्या आजी बॉंबे हॉस्पिटलमध्ये 40 वर्षांपासून "पेड मावशी' म्हणून रुग्णांची सेवा करत आहेत. आज त्यांच्याशी गप्पा मारताना, त्या कधी भूतकाळात शिरल्या कळलेच नाही. आई-वडिलांनी वयाच्या बाराव्या वर्षी लग्न लावून दिले. सोळाव्या वर्षी पहिले अपत्य पदरात पडले. सुखाने व आनंदात त्या काळ घालवू लागल्या. पण नियतीला काही वेगळेच मंजूर होते.

नाशिक : आपल्या सभोवताली जर व्यवस्थित निरीक्षण केले, तर साधारण दिसणाऱ्या व्यक्तीमध्ये असाधारण व्यक्तिमत्त्व लपलेले असते. हे असाधारण व्यक्तिमत्त्वच आपल्याला जीवनाची नवी दिशा देऊन जाते. आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक जण वीतभर पोटाची खळगी भरताना व मुलांचे पालनपोषण करताना अनेकदा ताणतणावाचे आयुष्य जगताना दिसून येतात. या सर्वांना मंगल आजीची कहाणी प्रेरणादायी ठरू शकते. 

हॅटस ऑफ मंगल आजी!!!

मंगल माल्या या 70 ते 75 वर्षे ओलांडलेल्या आजी बॉंबे हॉस्पिटलमध्ये 40 वर्षांपासून "पेड मावशी' म्हणून रुग्णांची सेवा करत आहेत. आज त्यांच्याशी गप्पा मारताना, त्या कधी भूतकाळात शिरल्या कळलेच नाही. आई-वडिलांनी वयाच्या बाराव्या वर्षी लग्न लावून दिले. सोळाव्या वर्षी पहिले अपत्य पदरात पडले. सुखाने व आनंदात त्या काळ घालवू लागल्या. पण नियतीला काही वेगळेच मंजूर होते. विशी न ओलांडलेल्या मंगलचे दुर्दैव बघा, नवऱ्याने दुसरा घरोबा केला आणि जीवनाच्या "सेकंड इंनिग'चा प्रवास सुरू झाला. मुलाला घेऊन मंगला कर्नाटकचे मेंगळुरू सोडून मुंबईत आल्या व मुंबईने त्यांना आपल्यात सामावून घेतले. मरिन लाइन्सच्या बॉंबे हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या सेवेसाठी प्रायव्हेट रूममध्ये महिला रुग्णांची "मावशी' म्हणून त्या सेवा करू लागल्या. मुलगा मोठा होत होता. कसाबसा दहावीला पोचला व नंतर शिक्षणाला राम राम ठोकून गडी मिळेल ते काम करू लागला. मंगल आजीने त्याचे लग्न लावून दिले. पण बायको त्याला सोडून गेली. अशातच त्याला दारूचे व्यसन जडले. आजीने दुसरा विवाह करून दिला. त्या दांपत्याला एक सुंदर मुलगी व मंगल आजीला नात झाली. तीच तिचे भावविश्‍व बनले व जीवनाचे एक ध्येय सापडले. तिचे पालनपोषण करताना नातीला उच्चशिक्षित बनविण्याचा ध्यास लागला व तिने तिची नात पूजा माल्या हिला एमबीएपर्यंत शिकविले. ती आज चांगल्या कंपनीत नोकरी करतेय. एक रुग्णवसा घेतलेली स्त्री मुलगा दारूच्या आहारी गेलेला; पण हिंमत न हरता नातीला चांगल्या विद्यापीठातून उच्चशिक्षण करवून दिले. 

हेही वाचा > मुलीची देहविक्री...भरपूर पैसा..असे स्वप्न आईवडिलांचे..पण...

हेही वाचा > धरणावर फिरायला आलेले पर्यटक गाडीपाशी गेले..अन् गाडीत पाहिल्यावर धक्काच...कारण..

 शिक्षकाच्या खोलीतून वाफा बाहेर येत होत्या... त्यांनी खिडकीचा कप्पा उघडून पाहिला तर धक्काच!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Senior Citzen Mangal Mallya completed her granddaughter,s education Nashik Marathi News