Elections
sakal
शिंदखेडा: लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर शिंदखेडा नगरपंचायत क्षेत्रात परिणाम करणारी बरीच राजकीय उलथापालथ झाली आहे. यात काँग्रेस, शिवसेना ‘उबाठा’ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामधील प्रमुख कार्यकर्त्यांनी भाजपची वाट धरली. त्यामुळे सुरुवातीला शिंदखेडा नगरपंचायत निवडणूक एकतर्फी होणार, असे चित्र समोर आले. मात्र, नव्या जोमाने संघटनात्मक तयारी सुरू करणाऱ्या काँग्रेसने महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या मदतीने सर्व १७ जागांवर पॅनल देण्याचे संकेत दिले आहेत.